मराठी बायबल 2006
|
| 1 |
| परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते. दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात. |
| 2 |
| परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत. चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात. |
| 3 |
| अग्री परमेश्वराच्या पुढे जातो आणि शत्रूंचा नाश करतो. |
| 4 |
| त्याची वीज आकाशात चमकते. लोक ती बघतात आणि घाबरतात. |
| 5 |
| परमेश्वरा समोर पर्वत मेणासारखे वितळतात. ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात. |
| 6 |
| आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या. |
| 7 |
| लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात. ते त्यांच्या “देवाला” नावजतात. परंतु त्या लोकांना लाज वाटेल. त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील. |
| 8 |
| सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का? कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो. |
| 9 |
| परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस. तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस. |
| 10 |
| जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो. देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो. |
| 11 |
| चांगल्या लोकांवर प्रकाश आणि सुख चमकते. |
| 12 |
| चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा. त्याच्या पवित्र नावाला मान द्या. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi/psalms/097.mp3
150
97