पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| याहवेह राज्य करतात, सर्व पृथ्वी उल्हासित होवो; दूर असलेले तटवर्ती क्षेत्रही हर्ष करोत. |
| 2 |
| मेघ व गडद अंधकार यांनी ते वेढलेले आहेत; धार्मिकता आणि न्याय त्यांच्या राजासनाचा पाया आहे. |
| 3 |
| अग्नी त्यांच्यापुढे चालतो, आणि त्यांच्या शत्रूंना तो सर्व बाजूने भस्म करतो. |
| 4 |
| त्यांच्या विजा जगाला प्रकाश देतात; हे पाहून पृथ्वी कंपित होते. |
| 5 |
| याहवेहच्या उपस्थितीत, समस्त पृथ्वीचे सत्ताधीश व सगळे पर्वत मेणाप्रमाणे वितळतात. |
| 6 |
| आकाश मंडल त्यांची नीतिमत्ता जाहीर करते; संपूर्ण मानवजात त्यांचे गौरव पाहते. |
| 7 |
| जे प्रतिमांची प्रौढी मिरवित होते, ते मूर्तींचे सर्व उपासक फजीत झाले. सर्व दैवतांनो, त्यांची आराधना करा! |
| 8 |
| सीयोन ऐकते व उल्हासित होते, याहवेह, तुमच्या निर्णयामुळे, यहूदीयातील गावे हर्षभरित होतात. |
| 9 |
| कारण याहवेह तुम्हीच पृथ्वीवर परमश्रेष्ठ आहात; सर्व दैवतांहून तुम्ही अत्यंत थोर आहात. |
| 10 |
| याहवेहवर प्रीती करणारे वाईटाचा द्वेष करोत, कारण ते त्यांच्या भक्तांच्या जिवाचे रक्षण करतात आणि दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवितात. |
| 11 |
| नीतिमानांवर प्रकाश उजळतो आणि निष्ठावंताची हृदये हर्ष पावतात. |
| 12 |
| सर्व नीतिमान, याहवेहच्या ठायी आनंद करा, आणि त्यांच्या पवित्र नावाला गौरव द्या. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/psalms/097.mp3
150
97