पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| स्तोत्र. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वत:साठी विजय साधला आहे. |
| 2 |
| परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे; राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. |
| 3 |
| त्याने इस्राएलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता ह्यांचे स्मरण केले आहे; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. |
| 4 |
| अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने, आनंदाने गा; त्याची स्तोत्रे गा. |
| 5 |
| परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा, वीणेवर सुस्वर स्तोत्र गा. |
| 6 |
| कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा. |
| 7 |
| समुद्र व त्यातील सर्वकाही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करोत. |
| 8 |
| नद्या टाळ्या वाजवोत; पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावोत; |
| 9 |
| कारण तो पृथ्वीचा न्याय करण्यास आला आहे; तो जगाचा न्याय यथार्थतेने करील, व लोकांचा न्याय सरळपणे करील. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/098.mp3
150
98