पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| परमेश्वर राज्य करतो; लोक कंपित होवोत; तो करूबांवर अधिष्ठित आहे; पृथ्वी थरथर कापो. |
| 2 |
| परमेश्वर सीयोनेत थोर आहे; तो सर्व लोकांहून परम थोर आहे. |
| 3 |
| ते तुझे थोर व भययोग्य नाव स्तवोत; पवित्र तोच आहे. |
| 4 |
| राजाचे सामर्थ्य न्यायप्रिय आहे; तू सरळता प्रस्थापित केली आहेस; तू याकोबात न्याय व नीती अंमलात आणली आहेस. |
| 5 |
| परमेश्वराची, आमच्या देवाची थोरवी गा व त्याच्या पादासनापुढे नमन करा; पवित्र तोच आहे. |
| 6 |
| त्याच्या याजकांपैकी मोशे व अहरोन, आणि त्याच्या नावाचा धावा करणार्यांपैकी शमुवेल, ह्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले. |
| 7 |
| मेघस्तंभांतून तो त्यांच्याशी बोलला; त्याचे निर्बंध व त्याने लावून दिलेले नियम त्यांनी पाळले. |
| 8 |
| हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस; तू त्यांना क्षमा करणारा असा देव होतास, तरी त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांना शासन करीत होतास. |
| 9 |
| परमेश्वर आपला देव ह्याची थोरवी गा, आणि त्याच्या पवित्र डोंगराजवळ नमन करा; कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/psalms/099.mp3
150
99