फारोने माणसे पाठवली तर पाहा, इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नव्हते. तथापि फारोचे मन कठीणच राहिले आणि त्याने लोकांना जाऊ दिले नाही. गळवांची पीडा
परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहाटेस उठून फारोपुढे उभा राहा, आणि त्याला सांग, ‘इब्र्यांचा देव परमेश्वर असे म्हणतो की, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे.
नाहीतर ह्या खेपेस मी सर्व प्रकारच्या पीडा तुझ्या हृदयावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या प्रजेवर पाठवतो, म्हणजे अखिल पृथ्वीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे तुला त्यावरून कळेल.
तर आता माणसे पाठवून रानातून तुझी जनावरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण; जी माणसे व गुरे घरी आसर्यास न आणल्यामुळे रानात सापडतील त्यांच्यावर गारांची झोड पडून ती मरतील.”’
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू आपला हात आकाशाकडे उगार म्हणजे सर्व मिसर देशावर गारांची वृष्टी होईल; मिसर देशातील माणसांवर, गुरांवर व शेतातील प्रत्येक वनस्पतीवर ती होईल.”
मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली तेव्हा परमेश्वराने मेघगर्जना व गारांची वृष्टी केली, आणि अग्नीचा लोळ जमिनीकडे येऊ लागला; ह्या प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर गारांचा वर्षाव केला.
ह्याप्रमाणे गारा पडत असता मधूनमधून अग्नीचा लोळ दिसत होता; ही गारांची वृष्टी एवढी भारी होती की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून त्यात कोठेही तशी वृष्टी कधी झाली नव्हती.
सर्व मिसर देशात माणसे, गुरेढोरे, वगैरे जे काही वनात होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला; शेतातील सर्व वनस्पतींवर मारा झाला आणि वनातील सर्व वृक्ष मोडून गेले.
मोशे त्याला म्हणाला, “मी नगराबाहेर गेलो की परमेश्वराकडे आपले हात पसरीन तेव्हा मेघगर्जना बंद होईल व गारा पडायच्या नाहीत; ह्यावरून तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.