|
| 1 |
|
| अंतःकरणाच्या योजना मानव करतो, परंतु जिभेचे योग्य उत्तर याहवेहपासून येते. |
|
| 2 |
|
| मनुष्यास वाटते कि त्याचे सर्व मार्ग शुद्ध आहेत, परंतु याहवेह त्याचा उद्देश पारखतात. |
|
| 3 |
|
| तुम्ही जे काही काम करता ते याहवेहकडे सोपवून द्या, आणि ते तुमच्या योजना यशस्वी करतील. |
|
| 4 |
|
| याहवेह सर्व कार्ये योग्य रीतीने सिद्धीस नेतात. दुष्टांच्या विनाशासाठी देखील त्यांनी एक दिवस नेमला आहे. |
|
| 5 |
|
| याहवेह गर्विष्ठ अंतःकरण असलेल्यांचा सर्वांचा तिरस्कार करतात. याची खात्री असू द्या: त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. |
|
| 6 |
|
| दया व सत्य यामुळे पापांचे प्रायश्चित होते; आणि याहवेहचे भय धरल्यामुळे दुष्टता टाळली जाते. |
|
| 7 |
|
| जर एखाद्या मनुष्यांचे मार्ग याहवेहला आवडले, तर ते त्याच्या शत्रूंबरोबरसुद्धा त्यांचा समेट घडवून आणतात. |
|
| 8 |
|
| अप्रामाणिक मार्गाने मिळविलेल्या अफाट संपत्तीपेक्षा प्रामाणिकपणे मिळविलेले थोडकेच बरे. |
|
| 9 |
|
| मानव त्यांच्या हृदयात त्यांच्या योजना करतात परंतु याहवेह त्यांच्या मार्गांची दिशा ठरवितात. |
|
| 10 |
|
| राजाच्या ओठांतील शब्द एखाद्या दिव्य वाणीप्रमाणे आहेत, आणि त्याचे मुख न्याय-विसंगति करीत नाही. |
|
| 11 |
|
| प्रामाणिकपणाची मापे आणि तराजू याहवेहची आहेत पिशवीतील सर्व वजने त्यांनीच तयार केली आहेत. |
|
| 12 |
|
| राजांना वाईट कृत्त्यांचा तिरस्कार वाटतो; कारण न्यायीपणावरच सिंहासन स्थिर राहते. |
|
| 13 |
|
| प्रामाणिकपणे बोलणारे राजांना प्रसन्न करतात; जे योग्य ते बोलतात त्याच्यावर ते प्रीती करतात. |
|
| 14 |
|
| राजाचा क्रोध म्हणजे मृत्यूचा दूत, परंतु सुज्ञ मनुष्य तो क्रोध शमवेल. |
|
| 15 |
|
| जेव्हा राजाचा चेहरा चमकतो, याचा अर्थ जीवदान आहे; त्याची कृपा वसंतऋतूमध्ये आलेल्या पावसाच्या ढगासारखी आहे. |
|
| 16 |
|
| सोन्यापेक्षा सुज्ञता मिळविणे कितीतरी पटीने चांगले आहे, आणि समंजसपणा, चांदी मिळविण्यापेक्षा चांगले आहे! |
|
| 17 |
|
| सुज्ञांचा मार्ग दुष्टाईला टाळतो; जे त्यांच्या मार्गांचे रक्षण करतात, त्यांचे आयुष्य सुरक्षित राहते. |
|
| 18 |
|
| नाशापूर्वी गर्व आणि अधःपातापूर्वी मग्रूरी येते. |
|
| 19 |
|
| गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे. |
|
| 20 |
|
| जो कोणी शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, त्याची समृद्धी होते, आणि जो याहवेहवर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित असतो. |
|
| 21 |
|
| सुज्ञ अंतःकरण समंजस म्हणून ओळखले जाते, आणि मधुर वचनांनी शिक्षणाला प्रोत्साहन मिळते. |
|
| 22 |
|
| सुज्ञाला सुज्ञता हा जीवनाचा झरा आहे; पण मूर्खाची मूर्खताच त्यांच्यावर शिक्षा आणते. |
|
| 23 |
|
| शहाण्याचे मन त्याच्या मुखावर ताबा ठेवते, आणि त्याचे ओठ ज्ञान प्रसार करते. |
|
| 24 |
|
| मधुर शब्द मधाच्या पोळासारखे असतात; ते आत्म्याला गोड वाटतात आणि हाडांना आरोग्य देतात. |
|
| 25 |
|
| एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो; परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो. |
|
| 26 |
|
| परिश्रम करणार्यांना भूक लागणे योग्य; भूक भागविण्यासाठी त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळते. |
|
| 27 |
|
| अधम वाईट योजना करतो, आणि त्यांच्या ओठांवर ती होरपळणाऱ्या अग्नीसारखी असते. |
|
| 28 |
|
| विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो, आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते. |
|
| 29 |
|
| हिंसा करणारा आपल्या शेजार्याला मोहात पाडतो आणि त्याला कुमार्गावर जाण्यास प्रेरित करतो. |
|
| 30 |
|
| जो कोणी त्याचे डोळे मिचकावतो तो विकृत योजना करीत असतो; जो कोणी त्याचे ओठ चावतो, तो वाईट प्रवृत्तीचा आहे. |
|
| 31 |
|
| पांढरे केस गौरवी मुकुट आहे; नीतिमत्तेच्या मार्गात चालल्याने तो लाभतो. |
|
| 32 |
|
| योद्धा असण्यापेक्षा शांत स्वभावी असणे बरे, शहर जिंकून घेणार्यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवणारा उत्तम. |
|
| 33 |
|
| आपण पदरात नाणेफेक करतो, पण त्याचा प्रत्येक निर्णय याहवेहच्या हाती असतो. |
|
|
|
|