|
| 1 |
|
| कलहाच्या वातावरणात मेजवानी खाण्यापेक्षा शांती व समाधानाने भाकरीचा कोरडा तुकडा खाणे बरे. |
|
| 2 |
|
| सुज्ञ गुलाम आपल्या धन्याच्या लज्जास्पद मुलावर सत्ता गाजवील, आणि कुटुंब सभासदाप्रमाणे मालमत्तेत वाटा मिळवील. |
|
| 3 |
|
| चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, परंतु अंतःकरणाची पारख याहवेहच करतात. |
|
| 4 |
|
| दुष्ट व्यक्ती फसवणूक करणार्याचे भाषण ऐकतो; लबाड बोलणारा मनुष्य विनाशकारी जिभेचे लक्ष देऊन ऐकतो. |
|
| 5 |
|
| जो गरिबांची चेष्टा करतो, तो त्याच्या निर्माणकर्त्याचा अनादर करतो; जो दुसर्यांवर आलेल्या संकटामध्ये आनंद करतो, त्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. |
|
| 6 |
|
| वयस्क माणसांची नातवंडे त्यांचे गौरवी भूषण आहेत; आणि मुलांचे भूषण त्यांचे मातापिता आहेत. |
|
| 7 |
|
| वक्तृत्वपूर्ण भाषण देवहीन मूर्खाला शोभत नाही— राजाने खोटे बोलणे कितीतरी अशोभनीय आहे! |
|
| 8 |
|
| लाच देणार्या माणसासाठी ती जादूच्या रत्नासारखी आहे; त्यांना वाटते की त्याने त्यांची कामे यशस्वी होतील. |
|
| 9 |
|
| जो कोणी प्रीतीची भावना जोपासतो तो अपराध झाकून देतो; परंतु जो कोणी ती अप्रिय गोष्ट पुन्हापुन्हा बोलतो त्याचे जवळचे मित्र दूरावतात. |
|
| 10 |
|
| मूर्खाला मारलेल्या शंभर फटक्यांपेक्षा विवेकी मनुष्याला रागावून बोललेला एक शब्द अधिक प्रभावी असतो. |
|
| 11 |
|
| वाईट कृत्ये करणारे परमेश्वराविरुद्ध बंडखोरी वाढवितात; मृत्यूचा दूत त्यांच्याकडे पाठविण्यात येईल. |
|
| 12 |
|
| जिची पिल्ले पळवून नेली आहेत त्या अस्वलीची तिची भेट झालेली चालेल, परंतु मूर्खपणाचा अट्टाहास करणाऱ्या मूर्खाची भेट नको. |
|
| 13 |
|
| जो चांगल्याची फेड वाईटाने करतो, त्याच्या घराला अरिष्ट कधीही सोडणार नाही. |
|
| 14 |
|
| भांडण सुरू करणे हे धरणाला भगदाड पाडण्यासारखे आहे; म्हणून ते सुरू होण्याआधीच तो विषय संपविणे बरे. |
|
| 15 |
|
| दोषी व्यक्तीला निर्दोष ठरविणे आणि निर्दोष व्यक्तीला दोषी ठरविणे— अशा दोन्हीचा याहवेह तिरस्कार करतात. |
|
| 16 |
|
| जर ते समजू शकत नाहीत तर ज्ञानवर्धनासाठी मूर्खाच्या हातात पैसे का असावेत? |
|
| 17 |
|
| खरा मित्र नेहमीच प्रेम करतो; आणि संकटसमयासाठीच भावाचा जन्म झालेला असतो. |
|
| 18 |
|
| जो हस्तांदोलन करून शपथ घेऊन शेजार्याच्या कर्जफेडीची हमी घेतो, तो विवेकहीन मनुष्य आहे. |
|
| 19 |
|
| जो कोणी कलहप्रिय असतो तो पापाची आवड धरतो; जो कोणी उंच प्रवेशद्वार बांधतो तो आपत्तींना आमंत्रण देतो. |
|
| 20 |
|
| ज्याचे हृदय भ्रष्ट आहे त्याची समृद्धी होत नाही; ज्याची जीभ विकृत भाषण करते, तो संकटात पडतो. |
|
| 21 |
|
| जो मूर्खाला जन्म देतो तो दुःखाला पाचारण करतो, आणि देवहीन मूर्खाच्या पालकांना आनंद मिळत नाही. |
|
| 22 |
|
| आनंदी मन औषधाप्रमाणे हितकर असते, पण खिन्न मन हाडे शुष्क करते. |
|
| 23 |
|
| न्यायाचे पारडे फिरविण्यासाठी, दुष्ट मनुष्य गुप्त रीतीने लाच घेतो. |
|
| 24 |
|
| समंजस मनुष्याची दृष्टी ज्ञानावर केंद्रित असते, पण मूर्खाची नजर पृथ्वीच्या शेवटपर्यंत सैरभैर फिरत असते. |
|
| 25 |
|
| मूर्ख मुलगा आपल्या वडिलांच्या दुःखास कारणीभूत होतो, आणि ज्या आईने त्याला जन्म दिला तिला क्लेश देतो. |
|
| 26 |
|
| निर्दोषांना दंड देणे योग्य नव्हे, तसेच प्रामाणिक अधिपतींना शिक्षा करणे हे निश्चितच चुकीचे आहे. |
|
| 27 |
|
| ज्ञानी संयमाने शब्दाचा वापर करतो, आणि समंजस शांत स्वभावाचा असतो. |
|
| 28 |
|
| जर ते शांत राहिले तर मूर्खही शहाणे समजले जातात, आणि जर त्यांच्या जिभेवर त्यांनी ताबा ठेवला, तर ते विवेकशील मानले जातात. |
|
|
|
|