|
| 1 |
|
| मैत्रीहीन मनुष्य शेवटी स्वार्थ साधून घेतो आणि सर्व यथार्थ न्यायाविरुद्ध जाऊन भांडणे सुरू करतो. |
|
| 2 |
|
| मूर्ख समंजसपणामध्ये संतोष मानत नाहीत; परंतु स्वतःची मते प्रकट करण्यात आनंद करतात. |
|
| 3 |
|
| जेव्हा दुष्टता येते तिथे तिरस्कार येतो, आणि निर्ल्लजपणाबरोबर निंदा येते. |
|
| 4 |
|
| तोंडातील शब्द खोल पाण्यासारखे आहेत; परंतु सुज्ञतेचा झरा म्हणजे पाण्याचा उफळता प्रवाह आहे. |
|
| 5 |
|
| न्यायाधीशाने दुष्टावर कृपा करणे आणि निरपराध्याला न्यायापासून वंचित करणे चुकीचे आहे. |
|
| 6 |
|
| मूर्खांच्या जिभा त्यांना कलहात पाडतात; आणि त्यांचे मुख माराला आमंत्रण देते. |
|
| 7 |
|
| मूर्खाचे मुख त्यांच्या विनाशाचे कारण होते, आणि त्यांच्या जिभेमुळे त्यांचे जीव सापळ्यात अडकतात. |
|
| 8 |
|
| अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात. |
|
| 9 |
|
| जो त्याचे काम करण्यात आळशी आहे, तो विध्वंस करणार्याचा भाऊ आहे. |
|
| 10 |
|
| याहवेहचे नाव बळकट दुर्ग आहे; नीतिमान तिकडे धाव घेतात आणि सुरक्षित राहतात. |
|
| 11 |
|
| धनवानाचे धन त्यांचे तटबंदीचे नगर आहे; ते कल्पना करतात की त्या उंच भिंती चढण्यास दुष्कर आहेत. |
|
| 12 |
|
| मनुष्याचा नाश होण्याआधी त्याचे हृदय गर्वाने भरते, परंतु सन्मान मिळण्याआधी मनुष्यास नम्रता येते. |
|
| 13 |
|
| ऐकून घेण्याआधीच उत्तर देणे— ते मूर्खपणाचे आणि लाजिरवाणे आहे. |
|
| 14 |
|
| मनुष्याचा आत्मा त्याला आजारी अवस्थेतही स्थिर ठेवतो, पण तुटलेले हृदय कोण सहन करू शकतो? |
|
| 15 |
|
| विवेकशील मनुष्याचे अंतःकरण ज्ञान आत्मसात करते. सुज्ञाचे कान ज्ञानाचा शोध घेतात. |
|
| 16 |
|
| उपहार तो देणार्याचा मार्ग मोकळा करते, तो तुम्हाला थोर लोकांच्या पुढे घेऊन जाईल! |
|
| 17 |
|
| दुसरा कोणीतरी पुढे येऊन पक्ष मांडत नाही, तोपर्यंत न्यायालयात प्रथम बोलणार्याची बाजू योग्य वाटते. |
|
| 18 |
|
| नाणेफेक करून भांडण मिटवता येते, आणि प्रबळ प्रतिस्पर्ध्यांला दूर ठेवता येते. |
|
| 19 |
|
| चुकीची वागणूक मिळालेल्या भावाची समजूत घालण्यापेक्षा तटबंदीचे शहर जिंकणे सोपे आहे. वादविवाद राजवाड्यातील बंद द्वारासारखे आहे. |
|
| 20 |
|
| त्यांच्या मुखफळाने मनुष्याचे पोट भरले जाते; त्यांच्या ओठांनी केलेल्या उत्पन्नामुळे त्यांचे समाधान होते. |
|
| 21 |
|
| जिभेत जीवन आणि मृत्यूचे सामर्थ्य आहे. आणि जे तिच्यावर प्रेम करतात त्यांना तिचे प्रतिफळ मिळते. |
|
| 22 |
|
| ज्याला पत्नी लाभते, त्याला चांगुलपणा प्राप्त झाला आहे. ती त्याच्यासाठी याहवेहकडून आनंददायी भेट आहे. |
|
| 23 |
|
| गरीब दयेसाठी विनवण्या करतो आणि श्रीमंत त्याला क्रूरतेने उत्तर देतो. |
|
| 24 |
|
| ज्यांचे मित्र अविश्वासू असतात, त्यांचा नाश लवकर होतो, पण एक असा मित्र आहे की जो भावापेक्षाही एकनिष्ठ राहतो. |
|
|
|
|