|
| 1 |
|
| हीही शलमोनाची नीतिसूत्रे आहेत; यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या माणसांनी ह्यांचा संग्रह केला. |
|
| 2 |
|
| एखादी गोष्ट गुप्त ठेवणे ह्यात देवाचे गौरव आहे; पण एखाद्याचा शोध लावणे ह्यात राजांचा गौरव आहे. |
|
| 3 |
|
| उंचीमुळे आकाशाचा, खोलीमुळे पृथ्वीचा, व राजांच्या मनाचा थांग लागत नाही. |
|
| 4 |
|
| रुप्यातला गाळ काढून टाक, म्हणजे धातू गाळणार्यासाठी त्याचे चांगले पात्र बनते. |
|
| 5 |
|
| राजासमोरून दुर्जनाला घालवून दे, म्हणजे त्याचे सिंहासन नीतिमत्तेच्या ठायी स्थापित होईल. |
|
| 6 |
|
| राजासमोर आपली प्रतिष्ठा मिरवू नकोस; थोर लोकांच्या जागी उभा राहू नकोस; |
|
| 7 |
|
| कारण कोणा सरदारास येताना पाहून त्याच्यासमोर तुला खालच्या जागी बसवण्यात यावे, त्यापेक्षा “वर येऊन बस” असे तुला म्हणावे हे बरे. |
|
| 8 |
|
| फिर्याद करायला जाण्याची उतावळी करू नकोस, ती तू केलीस आणि तुझ्या शेजार्याने तुझी फजिती केली तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल. |
|
| 9 |
|
| तुझा व तुझ्या शेजार्याचा वाद असला तर तो चालव, पण इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नकोस; |
|
| 10 |
|
| फोडल्यास तर ऐकणारा तुझी निर्भर्त्सना करील, आणि हे दूषण तुला लागून राहील. |
|
| 11 |
|
| रुपेरी करंड्यात सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय. |
|
| 12 |
|
| सोन्याचे कर्णभूषण आणि उत्कृष्ट सोन्याचा दागिना, तसा सुज्ञ उपदेशक लक्ष देणार्या कानाला आहे. |
|
| 13 |
|
| कापणीच्या समयी जसे बर्फाचे पेय, तसा विश्वासू जासूद त्याला पाठवणार्याला आहे, कारण तो आपल्या धन्याचा जीव गार करतो. |
|
| 14 |
|
| मेघ व वारा असून वृष्टी नाही, त्याप्रमाणे आपल्या देणग्यांची खोटी आढ्यता मिरवणारा आहे. |
|
| 15 |
|
| बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ हाड फोडते. |
|
| 16 |
|
| मध सापडल्यास तुला तो पुरे इतकाच खा. जास्त खाल्लास तर तुला वांती होईल. |
|
| 17 |
|
| शेजार्याच्या घरी आपले पाऊल विरळा टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील. |
|
| 18 |
|
| जो शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देतो तो घण, तलवार व तीक्ष्ण बाण ह्यांसारखा आहे. |
|
| 19 |
|
| संकटसमयी विश्वासघातक्यावर भरवसा ठेवणे हे तुटलेल्या दाताने खाणे, लचकलेल्या पायाने चालणे ह्यांसारखे आहे. |
|
| 20 |
|
| थंडीच्या दिवसांत अंगावरील पांघरूण काढणे, सोर्यावर शिरका घालण्यासारखे आणि खिन्न हृदयापुढे गायन करण्यासारखे आहे. |
|
| 21 |
|
| तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तान्हेला असल्यास त्याला पाणी प्यायला दे; |
|
| 22 |
|
| असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखार्यांची रास केल्यासारखे त्याला होईल. आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल. |
|
| 23 |
|
| उत्तरेचा वारा पाऊस आणतो, त्याप्रमाणे चुगलखोर जीभ मुद्रा क्रोधाविष्ट करते. |
|
| 24 |
|
| भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपर्याला बसणे पुरवले. |
|
| 25 |
|
| तान्हेल्या जिवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभवर्तमान होय. |
|
| 26 |
|
| दुर्जनापुढे स्थानभ्रष्ट झालेला नीतिमान हा गढूळ केलेला झरा, नासलेले जलकुंड ह्यांप्रमाणे आहे. |
|
| 27 |
|
| मधाचे अतिसेवन करणे बरे नाही; तसेच मनुष्याने आपल्या गौरवाच्या पाठीस लागण्यात काही अर्थ नाही. |
|
| 28 |
|
| ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गावकुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे. |
|
|
|
|