|
| 1 |
|
| यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या सहकार्यांनी संग्रहित केलेली, शलोमोन राजाची ही आणखी काही नीतिवचने आहेत: |
|
| 2 |
|
| रहस्य गुप्त ठेवणे हे परमेश्वराचे गौरव आहे; आणि गुप्त गोष्टींचा शोध लावणे हे राजाचे गौरव आहे. |
|
| 3 |
|
| जसे आकाशाची उंची आणि पृथ्वीची खोली, तसेच राजांच्या मनाचाही थांग लागत नाही. |
|
| 4 |
|
| चांदीतील मळ काढला म्हणजे रौप्यकार पात्र तयार करू शकतो; |
|
| 5 |
|
| राजाच्या दरबारातील भ्रष्ट अधिकारी काढून टाका आणि मग त्याचे राज्य न्यायीपणामुळे स्थिर राहील. |
|
| 6 |
|
| राजाच्या समक्षतेत प्रौढी मिरवू करू नकोस, आणि त्याच्या प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये स्थान ग्रहण करण्याचा दावा करू नकोस; |
|
| 7 |
|
| त्याच्या प्रतिष्ठित लोकांसमोर त्याने तुझा अपमान करावा, यापेक्षा “इकडे वर ये” असे तुला बोलणे अधिक रास्त वाटेल. तुझ्या डोळ्यांनी जे काही पाहिले आहे |
|
| 8 |
|
| ते न्यायालयात नेण्याची घाई करू नकोस, कारण जर तुझा शेजारी तुला फजीत करेल, तर शेवटी तू काय करशील? |
|
| 9 |
|
| जर तू तुझ्या शेजार्याला न्यायालयात घेऊन जातोस तर, दुसर्याच्या विश्वासाला धोका देऊ नकोस, |
|
| 10 |
|
| नाहीतर तो ऐकणारा तुला निर्लज्ज ठरवेल आणि तुझ्याविरुद्ध तो दावा दाखल करेल. |
|
| 11 |
|
| योग्य वेळेवर दिलेला सल्ला हा चांदीच्या करंड्यात ठेवलेल्या सोन्याच्या सफरचंदासारखा आहे. |
|
| 12 |
|
| न्यायाधीशाने केलेली कान उघाडणी, ऐकणार्या कानासाठी सुज्ञ म्हणजे सोन्याचे कर्णफूल किंवा उत्तम सोन्याचा दागिना यासारखी आहे. |
|
| 13 |
|
| ज्याने विश्वासू सेवकाला पाठविले त्याच्यासाठी तो उन्हाळ्यातील शीतल पेयासारखा आहे; तो त्याच्या मालकाला ताजेतवाने करतो. |
|
| 14 |
|
| कधीही न दिलेल्या देणगीबद्दल जो घमेंड करतो, तो वृष्टिहीन मेघ आणि वारा यासारखा आहे. |
|
| 15 |
|
| सहनशीलते द्वारे शासकाचे मन वळविता येते, कारण मृदू जिव्हा हाडे मोडू शकते. |
|
| 16 |
|
| तुम्हाला मध मिळाला तर, पुरेसाच खा— जास्त मध खाल्ल्यास तुम्ही ओकारी कराल. |
|
| 17 |
|
| तुझ्या शेजार्यांकडे पाय क्वचितच टाक— अतिपरिचय केल्यास शेजारी तुझा द्वेष करतील. |
|
| 18 |
|
| शेजार्याविरुद्ध खोटी साक्ष देणे म्हणजे, जाड काठीने किंवा तलवारीने मारणे किंवा तीक्ष्ण बाण सोडणे यासारखे आहे. |
|
| 19 |
|
| संकटसमयी बेभरवशाच्या माणसावर विश्वास ठेवणे म्हणजे तुटक्या दातांनी चावणे किंवा मोडक्या पायांनी पळण्यासारखे आहे. |
|
| 20 |
|
| ज्याचे अंतःकरण दुःखाने भरले आहे, त्याच्यासाठी हर्षगीत गाणे, एखाद्याचे पांघरूण थंडीच्या दिवसात काढून घेणे, किंवा जखमेवर शिरका ओतणार्यासारखे आहे. |
|
| 21 |
|
| तुझा शत्रू भुकेला असेल तर त्याला खावयास द्या; तो तान्हेला असेल तर त्याला प्यावयास पाणी दे. |
|
| 22 |
|
| असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्यांची रास कराल, आणि याहवेह तुम्हाला त्याचे प्रतिफळ देतील. |
|
| 23 |
|
| जसा उत्तरेकडील वारा अनपेक्षितपणे पाऊस आणतो तसेच कावेबाज जीभ—क्रोधित मुद्रेला चेतावणी देते. |
|
| 24 |
|
| भांडखोर पत्नीसह घरात राहण्यापेक्षा छतावरील एका कोपर्यात राहणे बरे. |
|
| 25 |
|
| दूरवरून आलेला शुभ संदेश तान्हेल्याला मिळालेल्या शीतल जलासारखा आहे. |
|
| 26 |
|
| नीतिमान मनुष्याने दुष्टासमोर माघार घेणे, हे पाण्याचा झरा दूषित होणे किंवा जलकुंड गढूळ होण्यासारखे आहे. |
|
| 27 |
|
| जसे अति मध खाणे हानिकारक आहे आणि अति खोल गोष्टींचा शोध घेणे सन्माननीय नसते. |
|
| 28 |
|
| स्वतःवर ताबा नसलेला मनुष्य तटबंदी ढासळलेल्या नगरासारखा आहे. |
|
|
|
|