|
| 1 |
|
| ज्याप्रमाणे उन्हाळ्यात बर्फ पडणे किंवा कापणीच्या वेळी पाऊस येणे जसे विसंगत आहे, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान मिळणे शोभत नाही. |
|
| 2 |
|
| जशी फडफडणारी चिमणी निसटून जाते किंवा निळवी उडून जाते, तसाच गैरवाजवीपणे दिलेल्या शापाचा प्रभाव होत नाही. |
|
| 3 |
|
| घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम आणि मूर्खाच्या पाठीला छडी पाहिजे! |
|
| 4 |
|
| मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको, नाहीतर तू सुद्धा त्याच्यासारखाच होशील. |
|
| 5 |
|
| मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर द्या, नाहीतर तो स्वतःला शहाणा समजू लागेल. |
|
| 6 |
|
| मूर्खाच्या हाती निरोप पाठविणे म्हणजे आपलेच पाय तोडून घेणे किंवा विष पिण्यासारखे आहे. |
|
| 7 |
|
| मूर्खाच्या मुखात नीतिवचने असणे, एखाद्या लंगड्या माणसाच्या निरुपयोगी पायांसारखे आहे. |
|
| 8 |
|
| मूर्खाचा सन्मान करणे म्हणजे गोफणीमध्ये दगड बांधून ठेवण्यासारखे आहे. |
|
| 9 |
|
| जसे दारुड्याच्या हातात काटेरी झाडाची फांदी, तसेच मूर्खाच्या मुखात नीतिवचने. |
|
| 10 |
|
| जो मूर्खाला किंवा जवळून जाणार्या कोणा अनोळखीलाही कामावर ठेवतो. तो नेम न धरता कोणालाही जखम करणार्या धनुर्धारीसारखा आहे. |
|
| 11 |
|
| जसा कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो तसाच मूर्ख पुन्हापुन्हा मूर्खपणा करतो. |
|
| 12 |
|
| आपल्याच दृष्टीत स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य तुम्ही पाहिला आहे काय? अशा माणसापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे. |
|
| 13 |
|
| आळशी म्हणतो “बाहेर रस्त्यावर सिंह आहे, एक भयानक सिंह मार्गात फिरत आहे!” |
|
| 14 |
|
| दार त्याच्या बिजागर्यांवर फिरते तसा आळशी बिछान्यावर कूस बदलत असतो. |
|
| 15 |
|
| आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो; तो हात पुन्हा तोंडापर्यंत नेण्यासाठीही त्याला आळस वाटतो. |
|
| 16 |
|
| स्वदृष्टीत शहाणा असणार्या आळशास वाटते कि तो यथायोग्य उत्तर देणाऱ्या सात लोकांपेक्षाही जास्त शहाणा आहे. |
|
| 17 |
|
| आपला संबंध नसलेल्यांच्या भांडणामध्ये पडणारे एखाद्या भटक्या कुत्र्याचे कान ओढणार्यासारखे असतात. |
|
| 18 |
|
| जसा एखादा माथेफिरू मृत्यूचे जळते बाण फेकतो, |
|
| 19 |
|
| तो अशा मनुष्यासारखा आहे, जो त्याच्या शेजार्यांना फसवितो आणि म्हणतो, “मी तर गंमत करीत होतो!” |
|
| 20 |
|
| लाकूड नसले तर आग विझते; आणि चहाड्या नसल्या की भांडण नाहीसे होते. |
|
| 21 |
|
| जसे कोळसे निखारे आणि लाकूड अग्नी प्रज्वलित करते, तशाच प्रकारे भांडखोर मनुष्य कलह उत्पन्न करतो. |
|
| 22 |
|
| अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात. |
|
| 23 |
|
| गोड शब्द उच्चारणाऱ्या दुष्टाचे अंतःकरण चांदीचा मुलामा दिलेल्या मातीच्या पात्रासारखे आहे. |
|
| 24 |
|
| शत्रू त्यांच्या वाणीद्वारे स्वतःला लपवितात, परंतु कपटाला ते त्यांच्या मनात थारा देतात. |
|
| 25 |
|
| जरी त्यांचे भाषण प्रसन्न करणारे आहे, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण सात प्रकारच्या वाईट गोष्टींनी त्यांचे अंतःकरण भरलेले असते. |
|
| 26 |
|
| त्यांचा द्वेषभाव लबाडीद्वारे लपविलेला असला तरी, त्यांचा दुष्टपणा सभेमध्ये उघड केला जाईल. |
|
| 27 |
|
| जो कोणी खड्डा करतो, तोच त्याच्यात पडेल; जर कोणी दगड ढकलून टाकतो, तो परत त्यांच्यावरच ढकलून दिला जाईल. |
|
| 28 |
|
| लबाड बोलणारी जीभ ज्याचा द्वेष करते त्याला दुखविते, आणि खुशामत करणारी जीभ नाशास कारणीभूत होते. |
|
|
|
|