|
| 1 |
|
| माझ्या मुला, माझे शिक्षण विसरू नकोस, परंतु माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात ठेव; |
|
| 2 |
|
| कारण ते तुझे आयुष्य अनेक वर्षापर्यंत वाढवतील, आणि तुला शांती आणि समृद्धी देतील. |
|
| 3 |
|
| प्रीती आणि विश्वासूपणा तुला कधीही न त्यागोत; त्यांना तू आपल्या गळ्याभोवती बांध, त्यांना तुझ्या हृदयाच्या पटलावर लिहून ठेव. |
|
| 4 |
|
| तेव्हा तुला परमेश्वराकडून आणि मानवाकडून अनुग्रह आणि सत्कीर्ती प्राप्त होतील. |
|
| 5 |
|
| तुझ्या संपूर्ण अंतःकरणापासून याहवेहवर भरवसा ठेव; आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस; |
|
| 6 |
|
| तुझ्या सर्व मार्गात तू त्यांच्या अधीन राहा, आणि ते तुझे मार्ग सुकर करतील. |
|
| 7 |
|
| स्वतःच्या नजरेत शहाणा होऊ नकोस; परंतु याहवेहचे भय बाळग आणि वाईटापासून दूर राहा. |
|
| 8 |
|
| हे तुझ्या देहाला आरोग्य देईल आणि तुझ्या हाडांना पोषकसत्व असे होईल. |
|
| 9 |
|
| तुझ्या संपत्तीने व तुझ्या सर्व पिकातील प्रथमफळांनी याहवेहचा सन्मान कर; |
|
| 10 |
|
| तेव्हा तुझी कोठारे समृद्धीने भरून जातील, आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने ओसंडून वाहतील. |
|
| 11 |
|
| माझ्या पुत्रा, याहवेहच्या शिस्तीचा अनादर करू नकोस; आणि त्यांनी निषेध केल्यास चिडू नकोस; |
|
| 12 |
|
| कारण जसा पिता मुलामध्ये आनंद मानतो, तसाच त्याला शिस्तही लावतो, याहवेह ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात! |
|
| 13 |
|
| ज्या मानवांना सुज्ञान प्राप्त होते व जे समंजसपणा मिळवितात ते धन्य. |
|
| 14 |
|
| कारण ती चांदीपेक्षा फारच लाभदायक आहे, आणि ती सोन्यापेक्षा अधिक फायदा मिळवून देते. |
|
| 15 |
|
| ती माणकांपेक्षा अधिक मोलवान आहे, तुला आवडणार्या कोणत्याही वस्तूंची तुलना तू तिच्याबरोबर करू शकत नाही. |
|
| 16 |
|
| तिच्या उजव्या हातात दीर्घायुष्य आहे; आणि धन व सन्मान तिच्या डाव्या हातात आहेत. |
|
| 17 |
|
| तिचे मार्ग आनंदाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व पाऊलवाटांवर शांती आहे. |
|
| 18 |
|
| जे तिला धरून राहतात त्यांना ती जीवनीवृक्षाप्रमाणे आहे; जे तिला घट्ट धरून राहतात, ते आशीर्वादित होतील. |
|
| 19 |
|
| सुज्ञानाद्वारे याहवेह यांनी पृथ्वीचा पाया घातला, शहाणपणाने त्यांनी आकाशाची स्थापना केली; |
|
| 20 |
|
| त्यांच्या ज्ञानाने खोल जले दुभागली गेली, आणि मेघांनी दवबिंदू पाडले. |
|
| 21 |
|
| माझ्या मुला, सुज्ञान आणि शहाणपण तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस, खरे न्यायीपण आणि विवेक जपून ठेव; |
|
| 22 |
|
| तीच तुझ्यासाठी जीवन असतील, ती तुझ्या गळ्याला कृपेचा अलंकार असतील. |
|
| 23 |
|
| मग तू तुझ्या मार्गाने सुरक्षित चालशील, आणि तुझा पाय अडखळणार नाही. |
|
| 24 |
|
| तू जेव्हा विसावा घेशील, तेव्हा तुला भीती वाटणार नाही; जेव्हा तू झोपशील, तुला गोड झोप लागेल. |
|
| 25 |
|
| अचानक आलेल्या संकटाला तू भिऊ नकोस, किंवा दुष्टांचा नाश होत असला तरी भिऊ नकोस; |
|
| 26 |
|
| कारण याहवेह तुझ्या बाजूला असतील आणि ते तुझा पाय पाशात अडकू देणार नाहीत. |
|
| 27 |
|
| ज्यांचे भले करण्याचे तुझ्या आटोक्यात असले, तर ते करण्यास नाकारू नकोस. |
|
| 28 |
|
| एखादी वस्तू तुझ्याजवळ असताना “तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे मी ती तुला देईन” असे तुझ्या शेजार्याला म्हणू नकोस. |
|
| 29 |
|
| तुझा शेजारी तुझ्याजवळ विश्वासाने राहत असताना, त्याचे वाईट करण्याचे योजू नकोस. |
|
| 30 |
|
| जर एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसेल, तर निष्कारण त्याच्यावर आरोप करू नकोस. |
|
| 31 |
|
| हिंसा करणार्यांचा हेवा करू नकोस, किंवा त्यांच्या कोणत्याही मार्गाची निवड करू नकोस. |
|
| 32 |
|
| कारण याहवेहना कुटिलपणाबद्दल घृणा वाटते, परंतु जो नीतिमान आहे त्याला ते विश्वासपात्र मानतात. |
|
| 33 |
|
| याहवेहचा शाप दुष्ट मनुष्याच्या घरावर असतो, परंतु नीतिमानाचे घर ते आशीर्वादित करतात. |
|
| 34 |
|
| उपहास करणार्या गर्विष्ठांचा ते उपहास करतात, परंतु जे नम्र आणि पीडित आहेत त्यांच्यावर ते कृपा करतात. |
|
| 35 |
|
| ज्ञानी लोकांना सन्मानाचा वारसा मिळतो, परंतु मूर्खांना फक्त लज्जा मिळते. |
|
|
|
|