|
| 1 |
|
| मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका, व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या. |
|
| 2 |
|
| कारण मी तुम्हांला उत्तम शिकवण देतो; माझे नीतिशिक्षण सोडू नका. |
|
| 3 |
|
| कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो. |
|
| 4 |
|
| ती मला शिकवी व म्हणे, “माझी वचने तुझ्या चित्ती राहोत; तू माझ्या आज्ञा पाळ व दीर्घायू हो; |
|
| 5 |
|
| ज्ञान संपादन कर, सुज्ञता संपादन कर; ती विसरू नकोस, माझ्या तोंडच्या वचनाला पराङ्मुख होऊ नकोस; |
|
| 6 |
|
| ते सोडू नकोस म्हणजे ते तुझे संरक्षण करील; त्याची आवड धर म्हणजे ते तुझा सांभाळ करील. |
|
| 7 |
|
| ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर; आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर. |
|
| 8 |
|
| त्याला उच्च पद दे म्हणजे ते तुझी उन्नती करील. त्याला कवटाळून राहशील तर ते तुझा गौरव करील; |
|
| 9 |
|
| ते तुला शोभिवंत शिरोभूषण देईल; ते तुला सुंदर मुकुट देईल.” |
|
| 10 |
|
| माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. |
|
| 11 |
|
| मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकवला आहे, तुला सरळतेच्या वाटांनी चालवले आहे. |
|
| 12 |
|
| तू चालशील तेव्हा तुझी पावले अडखळणार नाहीत; तू धावशील तेव्हा तुला ठेच लागणार नाही. |
|
| 13 |
|
| तू शिक्षण दृढ धरून ठेव; सोडू नकोस; ते जवळ राख; कारण ते तुझे जीवन आहे, |
|
| 14 |
|
| दुर्जनांच्या मार्गात शिरू नकोस; दुष्टांच्या मार्गाने चालू नकोस. |
|
| 15 |
|
| त्यापासून दूर राहा, त्याच्या जवळून जाऊ नकोस; त्यावरून मागे फीर आणि आपल्या मार्गाला लाग. |
|
| 16 |
|
| कारण दुष्कर्म केल्यावाचून त्यांना झोप येत नाही; कोणाला पाडले नाही, तर त्यांची झोप उडते. |
|
| 17 |
|
| कारण ते दुष्टाईने मिळवलेले अन्न खातात, बलात्काराने मिळवलेला द्राक्षारस पितात, |
|
| 18 |
|
| परंतु नीतिमानांचा मार्ग मध्यान्हापर्यत उत्तरोत्तर वाढणार्या उदयप्रकाशासारखा आहे. |
|
| 19 |
|
| दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे; त्यांना कशाची ठेच लागते हे त्यांना कळत नाही. |
|
| 20 |
|
| माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव; माझ्या सांगण्याकडे कान दे. |
|
| 21 |
|
| ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नकोस; ती आपल्या अंतःकरणात ठेव. |
|
| 22 |
|
| कारण ती ज्यांना लाभतात, त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात. |
|
| 23 |
|
| सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. |
|
| 24 |
|
| तू उद्दामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटिल वाणीपासून फार दूर राहा. |
|
| 25 |
|
| तुझे डोळे नीट पुढे पाहोत. तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत. |
|
| 26 |
|
| आपल्या पायांची वाट सपाट कर; तुझे सर्व मार्ग निश्चित असोत. |
|
| 27 |
|
| तू डावीउजवीकडे वळू नकोस; दुष्कर्मातून आपले पाऊल काढ. |
|
|
|
|