|
| 1 |
|
| माझ्या मुला, तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे, |
|
| 2 |
|
| म्हणून तू माझ्या ज्ञानशिक्षणाकडे लक्ष लाव. माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे. |
|
| 3 |
|
| कारण परस्त्रीच्या ओठांतून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते; |
|
| 4 |
|
| तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते. |
|
| 5 |
|
| तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले अधोलोकास लागतात; |
|
| 6 |
|
| म्हणून तिला जीवनाची नीट वाट सापडत नाही; तिचे मार्ग डळमळीत आहेत, हे तिला कळत नाही. |
|
| 7 |
|
| तर आता मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडची वचने सोडू नका. |
|
| 8 |
|
| तिच्याकडची वाट सोडून दे, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नकोस; |
|
| 9 |
|
| गेलास तर तुझी अब्रू दुसर्यांच्या हाती जाईल; आणि तुझ्या आयुष्याचे दिवस निष्ठुरांच्या हाती जातील; |
|
| 10 |
|
| तुझ्या धनाने परके गबर होतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसर्याच्या घरात जाईल; |
|
| 11 |
|
| आणि परिणामी तुझा देह व तुझी शक्ती क्षीण झाल्यावर तू शोक करशील; |
|
| 12 |
|
| आणि मग तू येणेप्रमाणे म्हणशील: “मी शिक्षणाचा द्वेष कसा केला? माझ्या अंत:करणाने शासन कसे तुच्छ मानले? |
|
| 13 |
|
| मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही. |
|
| 14 |
|
| मंडळी व सभा ह्यांच्यादेखत मी बहुतेक दुष्कर्मात गढलेला असे.” |
|
| 15 |
|
| तू आपल्याच टाकीतले पाणी पी. आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी. |
|
| 16 |
|
| तुझे झरे बाहेर वाहून जावेत काय? तुझे जलाचे प्रवाह रस्त्यांवरून वाहावेत काय? |
|
| 17 |
|
| ते केवळ तुझ्यासाठीच असोत; तुझ्याबरोबर दुसर्यांना त्यांचा उपयोग न घडो. |
|
| 18 |
|
| तुझ्या झर्याला आशीर्वाद प्राप्त होवो; तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट राहा. |
|
| 19 |
|
| रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी ह्यांप्रमाणेच तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो. |
|
| 20 |
|
| माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावेस? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे? |
|
| 21 |
|
| मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहेत; आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करतो. |
|
| 22 |
|
| दुर्जनाला त्याची स्वत:चीच दुष्कर्मे पछाडतात; तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो. |
|
| 23 |
|
| त्याला शिक्षण मिळाले नाही म्हणून तो मरतो; तो आपल्या अति मूर्खपणामुळे भ्रांत होतो. |
|
|
|
|