|
| 1 |
|
| माझ्या मुला, माझी वचने जपून ठेव, आणि माझ्या आज्ञांचा तुझ्या अंतःकरणात संग्रह करून ठेव. |
|
| 2 |
|
| माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू जगशील; तुझ्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे माझ्या शिक्षणाचे रक्षण कर. |
|
| 3 |
|
| तुझ्या बोटांवर त्या बांधून ठेव; तुझ्या हृदयाच्या पटलावर त्या लिहून ठेव. |
|
| 4 |
|
| “तू माझी बहीण आहेस,” असे सुज्ञानाला, आणि “तू माझा नातेवाईक आहेस.” असे अंतर्ज्ञानाला म्हण. |
|
| 5 |
|
| म्हणजे व्यभिचारी स्त्रीपासून ते तुला दूर ठेवतील, वाईट स्त्रीच्या मोहक शब्दांपासून ते तुझे रक्षण करतील. |
|
| 6 |
|
| माझ्या घराच्या खिडकीच्या जाळीतून मी खाली पाहिले. |
|
| 7 |
|
| साध्याभोळ्या पुरुषांमध्ये मी पाहिले, तरुणांचे मी अवलोकन केले, तेव्हा एक विवेकशून्य तरुण दिसला. |
|
| 8 |
|
| तो तिच्या रस्त्याच्या कोपर्याजवळून जात होता, सरळ तिच्या घराच्या दिशेने जात होता. |
|
| 9 |
|
| दिवसाच्या संधिप्रकाशात, संध्याकाळच्या अंधारात होता. |
|
| 10 |
|
| तेव्हा त्याला भेटण्यास एक स्त्री बाहेर आली, तिची वेशभूषा एखाद्या वेश्येसारखी असून ती धूर्त होती. |
|
| 11 |
|
| (ती बेशिस्त आणि उर्मट आहे, तिचे पाय तिच्या घरात थांबत नाहीत; |
|
| 12 |
|
| आता तर ती रस्त्यावर आहे, आता ती चौकांमध्ये आहे प्रत्येक कोपर्यावर ती लपून बसते.) |
|
| 13 |
|
| तिने त्याला पकडले आणि त्याचे चुंबन घेतले, आणि निर्लज्ज चेहऱ्याने ती म्हणाली: |
|
| 14 |
|
| आज मी माझी वचने पूर्ण केली आहेत, आणि माझ्या घरी शांत्यर्पण आहे. |
|
| 15 |
|
| म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी बाहेर आले; मी तुला शोधले आणि तू मला सापडलास! |
|
| 16 |
|
| मी माझा पलंग इजिप्त येथील सुताच्या रंगीबेरंगी चादरींनी सजविला आहे. |
|
| 17 |
|
| ऊद, जटामांसी व दालचिनी यांनी मी माझी शय्या सुवासिक केली आहे. |
|
| 18 |
|
| चल, पहाटेपर्यंत आपण प्रीतीत यथेच्छ रमून जाऊ; आपण एकमेकांना प्रीतीचा आनंद देऊ! |
|
| 19 |
|
| कारण माझे पती घरी नाहीत; ते दूर प्रवासाला गेले आहेत; |
|
| 20 |
|
| त्याने त्याची पैशाची थैली भरून घेतली आहे, आणि पौर्णिमेपर्यंत ते घरी परत येणार नाहीत. |
|
| 21 |
|
| तिच्या मोहक शब्दांनी वश करून तिने त्याला चुकीच्या मार्गाने नेले; गोड बोलून तिने त्याला मोहात पाडले. |
|
| 22 |
|
| जसा बैल कापणार्याकडे जातो, तसा क्षणातच तो तिच्यामागे गेला, हरिण जसे दोर्यांच्या फासात पाय टाकते |
|
| 23 |
|
| तोपर्यंत बाण त्याच्या पोटात घुसतो, ज्याप्रमाणे पक्षी वेगाने पाशात अडकतो, त्याला माहीत नसते की ते त्याच्यासाठी प्राणघातक आहे. |
|
| 24 |
|
| तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका, मी काय बोलतो त्याकडे लक्ष द्या. |
|
| 25 |
|
| तुमचे मन तिच्या मार्गाकडे जाऊ देऊ नका किंवा बहकून जाऊन तिच्या वाटेने जाऊ नका. |
|
| 26 |
|
| कारण तिने अनेकांना घायाळ करून पाडले आहे; होय, अनेक बलवान पुरुषांना तिने ठार केले आहे. |
|
| 27 |
|
| तिचे घर हा नरकाकडे जाणारा महामार्ग, आणि खाली मृत्यूच्या खोल्यांकडे नेणारा मार्ग आहे. |
|
|
|
|