|
| 1 |
|
| सुज्ञानाने आपले घर बांधले आहे; तिने तिचे सात खांब तयार केले आहेत. |
|
| 2 |
|
| तिने तिच्याकडील मांसाहारी भोजन आणि तिचा द्राक्षारस तयार केला आहे; तिने तिचा मेजसुद्धा सजविलेला आहे. |
|
| 3 |
|
| तिने तिच्या दासांना बाहेर पाठवले आहे आणि ती नगराच्या सर्वात उच्च स्थानावरून हाक मारते, |
|
| 4 |
|
| “जे साधे भोळे आहेत, त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते, |
|
| 5 |
|
| “इकडे या, माझे भोजन खा आणि मी मिसळलेला द्राक्षारस प्या. |
|
| 6 |
|
| तुमचे साधेभोळेपण सोडून द्या म्हणजे तुम्ही जगाल; अंतर्ज्ञानाच्या मार्गाने चला.” |
|
| 7 |
|
| जो टवाळखोराची सुधारणा करतो, तो अपमानास आमंत्रण देतो; जो दुष्टाला धमकावितो त्याला अपशब्द ऐकावे लागतात. |
|
| 8 |
|
| टवाळखोरांची कान उघाडणी करू नकोस, नाहीतर ते तुझा द्वेष करतील, सुज्ञ माणसांची कान उघाडणी कर आणि ते तुजवर प्रीती करतील. |
|
| 9 |
|
| सुज्ञ मनुष्याला बोध कर म्हणजे ते अधिक ज्ञानी होतील; नीतिमानाला शिक्षण दे आणि ते त्यांच्या शिक्षणात भर घालतील. |
|
| 10 |
|
| याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, आणि पवित्र परमेश्वराचे ज्ञान असणे हा सुज्ञपणा होय. |
|
| 11 |
|
| कारण सुज्ञतेद्वारे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील, आणि तू उदंड आयुष्य जगशील. |
|
| 12 |
|
| जर तू सुज्ञ असशील, तर तुझे सुज्ञान तुला बक्षीस देईल; जर तू टवाळखोर आहेस, तर तू एकटाच यातना भोगशील. |
|
| 13 |
|
| मूर्खपणा एक स्वैर स्त्री आहे; ती साधीभोळी आहे आणि तिला काहीच समज नाही. |
|
| 14 |
|
| ती तिच्या घराच्या दारात बसून राहते, तसेच नगराच्या सर्वात उंच ठिकाणावर ती बसते. |
|
| 15 |
|
| तिच्याजवळून जाणाऱ्या, जे सरळ त्यांच्या मार्गाने जातात, त्यांना ती बोलाविते, |
|
| 16 |
|
| “जे साधे भोळे आहेत त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते, |
|
| 17 |
|
| “चोरलेले पाणी गोड लागते; गुप्तपणे खाल्लेले अन्न चविष्ट लागते!” |
|
| 18 |
|
| परंतु त्यांना हे माहीत नसते की तिथे मेलेले लोक आहेत, आणि तिचे पाहुणे आता मृतांच्या खोल जगात आहेत. |
|
|
|
|