|
| 1 |
|
| मी शारोनाचे कुंकुमपुष्प आहे; मी खोर्यातले भुईकमळ आहे. |
|
| 2 |
|
| काटेरी झुडपांमध्ये जसे भुईकमळ तशी इतर युवतींमध्ये माझी सखी आहे. |
|
| 3 |
|
| वनवृक्षांमध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा तरुणांमध्ये माझा वल्लभ. त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला; त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले. |
|
| 4 |
|
| त्याने मला आपल्या पानगृहात आणले; त्याने माझ्यावर प्रेमध्वजा फडकावली. |
|
| 5 |
|
| मनुकांची पोळी देऊन माझ्या जिवाला आराम द्या; सफरचंद खाऊन मला हुशारी येऊ द्या. मी प्रेमज्वराने पीडित झाले आहे; |
|
| 6 |
|
| त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे; त्याचा उजवा हात मला आलिंगत आहे. |
|
| 7 |
|
| यरुशलेमाच्या कन्यांनो, तुम्हांला वनातील मृगींची, हरिणींची शपथ घालून सांगते; माझ्या प्रेमानंदाला व्यत्यय आणू नका, विघ्न आणू नका; तो राहील तितका वेळ राहू द्या. |
|
| 8 |
|
| हा माझ्या वल्लभाचा शब्द! पाहा तो डोंगरावरून उड्या मारत, टेकड्यांवरून दौडत येत आहे! |
|
| 9 |
|
| माझा वल्लभ हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा आहे; पाहा, तो आमच्या भिंतीमागे उभा आहे; तो खिडकीतून डोकावत आहे तो झरोक्यांतून पाहत आहे. |
|
| 10 |
|
| माझा वल्लभ मला म्हणाला, “माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल. |
|
| 11 |
|
| पाहा, हिवाळा गेला आहे; पाऊस संपून गेला आहे; |
|
| 12 |
|
| पृथ्वीवर फुले दिसू लागली आहेत; पक्षी गाऊ लागण्याचा समय आला आहे; आमच्या प्रांतात होल्याचा शब्द ऐकू येत आहे. |
|
| 13 |
|
| अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत; द्राक्षीला फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे; माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ, चल, ये. |
|
| 14 |
|
| अगे माझे कपोते, खडकाच्या कपारीत, कड्याच्या आडोशास राहणारे, मला तुझे मुख पाहू दे, तुझा शब्द मला ऐकू दे; कारण तुझा कंठ मधुर आहे; तुझे मुख रम्य आहे. |
|
| 15 |
|
| द्राक्षीच्या मळ्यांची नासधूस करणार्या खोकडांना, त्या लहान कोल्ह्यांना आमच्यासाठी धरा, कारण आमचे द्राक्षांचे मळे फुलले आहेत.” |
|
| 16 |
|
| माझा वल्लभ माझा, व मी त्याची; तो आपला कळप भुईकमळांत चारत आहे. |
|
| 17 |
|
| शिळोप्याची वेळ, छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत तू फिरत राहा. माझ्या वल्लभा, हरिणाप्रमाणे, मृगीच्या पाडसाप्रमाणे वियोगपर्वतांवर फीर. |
|
|
|
|