पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| रात्री शय्येवर पडले असता माझ्या प्राणप्रियाच्या दर्शनाची उत्कंठा मला लागली; मी त्याला चोहीकडे पाहिले; पण तो मला आढळला नाही. |
| 2 |
| माझ्या मनात आले की आता उठून शहरभर फिरावे, आपल्या प्राणप्रियाचा शोध पेठांतून व गल्ल्यांतून करावा; मी त्याचा शोध केला पण तो मला आढळला नाही. |
| 3 |
| नगरात फिरणारे जागल्ये मला भेटले; मी त्यांना विचारले, “माझा प्राणप्रिय तुम्हांला कोठे आढळला काय?” |
| 4 |
| त्यांना सोडून मी अंमळ पुढे जाते तोच माझा प्राणप्रिय मला भेटला; मी त्याला धरून ठेवले; मी त्याला आपल्या मातृगृही आपल्या जननीच्या कोठडीत आणीपर्यंत सोडले नाही. |
| 5 |
| यरुशलेमेच्या कन्यांनो, तुम्हांला वनातील मृगींची, हरिणींची शपथ घालून सांगते, माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका, विघ्न आणू नका. तो राहील तितका वेळ राहू द्या. |
| 6 |
| गंधरस व ऊद, सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये ह्यांच्या सुगंधाने युक्त असे धुरांच्या स्तंभांसारखे रानातून हे येत आहे ते काय? |
| 7 |
| पाहा, तो शलमोनाचा मेणा येत आहे; त्याच्याबरोबर साठ वीर पुरुष चालत आहेत; ते इस्राएलाच्या वीर पुरुषांपैकी आहेत. |
| 8 |
| ते सर्व खड्गधारी व युद्धप्रवीण आहेत; रात्रीच्या समयी प्राप्त होणार्या भयास्तव प्रत्येकाच्या कमरेला तलवार लटकत आहे. |
| 9 |
| शलमोन राजाने आपणासाठी लबानोनी लाकडाचा एक मेणा करवला आहे. |
| 10 |
| त्याचे दांडे रुप्याचे आहेत; त्याची पाठ सोन्याची आहे; त्याची गादी जांभळ्या रंगाची आहे; त्याचा अंतर्भाग यरुशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने विभूषित केला आहे. |
| 11 |
| सीयोननिवासी कन्यांनो, बाहेर या, शलमोन राजाला पाहा; त्याच्या विवाहदिवशी, त्याच्या मनाला उल्लास झाला त्या दिवशी, त्याच्या मातेने त्याला घातलेल्या मुकुटाने मंडित झालेला, असा हा पाहा. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/songofsolomon/003.mp3
8
3