पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| हे सर्व स्त्रियांमधील परमसुंदरी, तुझा प्रियकर कुठे गेला? कोणत्या मार्गाने वळला आहे, की तुझ्याबरोबर आम्हीही त्याला शोधू? |
| 2 |
| माझा प्रियकर त्याच्या बागेत, आपल्या सुगंधी झाडांच्या वाफ्यात, तो कमळिनी शोधून गोळा करण्यास तो गेला आहे. |
| 3 |
| मी माझ्या प्रियकराची आहे, आणि माझा प्रियकर माझाच आहे; कमळिनीमध्ये तो फुले शोधित आहे. |
| 4 |
| माझ्या प्रिये, तू तिरजाह नगरीसारखी सुंदर आहेस, जसे यरुशलेम मनोहर आहे, जसे ध्वज फडकविणारे विजयी सैन्य तशी तू ऐश्वर्यशाली आहे. |
| 5 |
| माझ्यावरून तू आपली दृष्टी काढ; कारण तुझे नयन मला भारावून सोडतात. तुझे केस गिलआद डोंगरावर चकाकणार्या शेळ्यांच्या कळपाप्रमाणे आहेत. |
| 6 |
| तुझे दात नुकत्याच धुतलेल्या मेंढरांच्या कळपाप्रमाणे आहेत. प्रत्येकाला आपले जुळे आहेत, त्यात एकही उणा नाही. |
| 7 |
| ओढणीआड असलेले तुझे गाल डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत. |
| 8 |
| तिथे साठ राण्या, आणि ऐंशी उपपत्नी, आणि कुमारिका तर असंख्य असतील; |
| 9 |
| पण हे माझ्या कबुतरे, तू परिपूर्ण, व निराळी आहेस, तिच्या आईची एकुलती एक कन्या असून, जिने तिला जन्म दिला तिची लाडकी आहे. तरुण स्त्रियांनी तिला पाहून, धन्य म्हटले; राण्या व उपपत्नी यांनी देखील तिची प्रशंसा केली. |
| 10 |
| जो पहाटेसारखा प्रसन्न, चंद्रासारखा मनोरम, सूर्यासारखा प्रकाशमान, मिरवणुकीतील तार्यासारखे गौरवी दिसणारे असे हे कोण आहे? |
| 11 |
| दर्याखोर्यात वाढत असलेली नवी झाडे, द्राक्षवेलींना आलेले अंकुर, आणि डाळिंबाला आलेली फुले पाहण्यासाठी मी खाली अक्रोडाच्या झाडांच्या मळ्यात गेलो. |
| 12 |
| मला समजण्यापूर्वी, माझ्या इच्छेने मला माझ्या लोकांच्या शाही रथामध्ये स्थान दिले. |
| 13 |
| परत ये, शुलेमकन्ये परत ये; आम्ही तुला न्याहाळावे म्हणून परत ये, परत ये! महनाईमचे नृत्य पाहण्यासारखे तुम्ही शुलेमकन्येला का न्याहाळता? |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/songofsolomon/006.mp3
8
6