पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| हे राजकन्ये, तुझे पादत्राणयुक्त पाय किती सुंदर आहेत! कुशल कारागिराच्या हातांनी घडवलेल्या रत्नहारांसारख्या तुझ्या जांघा गोल आहेत. |
| 2 |
| तुझी नाभी वाटोळा गरगरीत पेलाच आहे; त्यात मिश्रित द्राक्षारसाची वाण नाही, तुझे उदर सभोवती भुईकमळे लावलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे. |
| 3 |
| तुझे कुचद्वय हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखे आहे. |
| 4 |
| तुझा कंठ हस्तदंती मनोर्यासारखा आहे; तुझे नेत्र बाथ-रब्बीमच्या वेशीजवळील हेशबोनच्या कुंडांसारखे आहेत; तुझे नाक दिमिष्कासमोरील लबानोनाच्या बुरुजासारखे आहे. |
| 5 |
| तुझा शिरोभाग कर्मेलासारखा आहे; तुझ्या डोक्याचे केस जांभळ्या वस्त्रासारखे आहेत; तुझ्या केशपाशात राजा बद्ध आहे. |
| 6 |
| हे प्रिये, मनोरम विषयांमध्ये तू किती सुंदर, किती चित्ताकर्षक आहेस! |
| 7 |
| तुझा हा बांधा तालवृक्षासारखा आहे; तुझे कुच द्राक्षांच्या घोसांसारखे आहेत. |
| 8 |
| मी म्हटले, मी तालवृक्षावर चढून त्याच्या शाखा धरीन; तेव्हा तुझे कुच मला द्राक्षांच्या घोसांसमान व्हावेत, आणि तुझ्या नासिकेचा श्वास सफरचंदाच्या सुवासासमान व्हावा. |
| 9 |
| तुझे मुख उत्तम द्राक्षारसासमान व्हावे; तो माझ्या प्रियेप्रीत्यर्थ घशात नीट उतरतो; निद्रिस्तांच्याही तोंडांतून तो खाली सहज जातो. |
| 10 |
| मी आपल्या वल्लभाची आहे; त्याचे मन माझ्यावर बसले आहे. |
| 11 |
| माझ्या वल्लभा, ऊठ, आपण गांवढ्यात जाऊ; खेड्यात रात्र घालवू. |
| 12 |
| आपण प्रातःकाळी उठून द्राक्षीच्या मळ्यात जाऊ; तेथे द्राक्षी फुटून तिच्या कळ्या उमलल्या आहेत की काय, डाळिंबीला फुले आली आहेत की काय, ते पाहू; तेथे मी आपले प्रेम तुला अर्पण करीन. |
| 13 |
| पुत्रदात्रीचा सुगंध सुटला आहे; आमच्या दारांवर नाना प्रकारची नव्याजुन्या बारांची उत्तम फळे आहेत; हे माझ्या वल्लभा, ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/songofsolomon/007.mp3
8
7