पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| त्या दिवशी तू म्हणशील, “हे परमेश्वरा, तुझा मी धन्यवाद करतो, कारण तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप शमला आहे व तू माझे सांत्वन केले आहेस. |
| 2 |
| पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर1 माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.” |
| 3 |
| तेव्हा तुम्ही तारणकूपातून उल्लासाने पाणी काढाल. |
| 4 |
| त्या दिवशी तुम्ही म्हणाल: “परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याच्या नामाचा जयघोष करा, राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये विदित करा; त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा. |
| 5 |
| परमेश्वरापुढे गायन करा कारण त्याची करणी प्रतापमय आहे; हे सर्व पृथ्वीवर विदित होवो. |
| 6 |
| अगे सीयोननिवासिनी, जयघोष कर, गजर कर; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठायी थोर आहे.” |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/isaiah/012.mp3
66
12