पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मवाबाविषयीची देववाणी: एका रात्रीत मवाबाचे आर उजाड झाले, नष्ट झाले; एका रात्रीत मवाबाचे कीर उजाड झाले, नष्ट झाले. |
| 2 |
| बईथ व दीबोन उच्च स्थानी विलाप करण्यास चढून जात आहेत; नबो व मेदबा ह्यांवर जाऊन मवाब आक्रंदन करीत आहे; सर्वांची डोकी मुंडलेली आहेत; प्रत्येकाची दाढी काढलेली आहे. |
| 3 |
| आपल्या पेठांत ते गोणपाट नेसून आहेत; आपल्या धाब्यांवर व चौकांत ते सगळे आकांत करत आहेत, अश्रू ढाळत आहेत. |
| 4 |
| हेशबोन व एलाले ही ओरडत आहेत, याहसापर्यंत त्यांचा आक्रोश ऐकू जात आहे; ह्यास्तव मवाबाचे हत्यारबंद लोक आरोळ्या देत आहेत; त्यांचा जीव घाबरा झाला आहे; |
| 5 |
| माझे हृदय मवाबाविषयी आक्रोश करीत आहे; त्याचे सरदार सोअर नगर, एग्लाथ-शलिशिया येथवर पळून गेले आहेत;1 लूहीथ चढणीवर ते रडत रडत चढत आहेत; होरोनाइमाच्या वाटेवर नाश झाल्याची आरोळी ते करीत आहेत. |
| 6 |
| निम्रीमाचे पाणी आटले आहे, गवत वाळून गेले आहे; झाडपाला सुकून गेला आहे; हिरवळ नाहीशी झाली आहे. |
| 7 |
| ह्यास्तव त्यांनी वाचवलेले व साठवलेले धन ते वाळुंजाच्या ओहळापलीकडे नेत आहेत. |
| 8 |
| कारण मवाबाच्या प्रदेशात चोहोकडे आरडाओरड झाली आहे; त्यांचे आक्रंदन एग्लाइमापर्यंत, त्यांचा आक्रोश बैर-एलीमापर्यंत ऐकू जात आहे. |
| 9 |
| दीमोनाचे जलप्रवाह रक्ताने भरले आहेत; आणि दीमोनावर मी आणखी अरिष्ट आणणार; मवाबाच्या वाचलेल्या लोकांवर व देशातील अवशिष्ट लोकांवर एक सिंह आणणार. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/isaiah/015.mp3
66
15