पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| त्या वेळी बलदानाचा पुत्र मरोदख बलदान,1 जो बाबेलचा राजा, त्याने हिज्कीयाला पत्रे व नजराणा ही पाठवली; कारण तो आजारी पडल्यानंतर बरा झाला असे त्याने ऐकले होते. |
| 2 |
| तेव्हा त्यांच्यावर हिज्कीयाने खूश होऊन त्यांना आपले अमोल भांडार दाखवले; आपले सोनेरुपे, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सगळे शस्त्रागार, सारांश, आपल्या भांडागारात होते नव्हते ते सगळे त्याने त्यांना दाखवले, त्याच्या घरात व सगळ्या राज्यात त्यांना दाखवायचे काहीएक राहिले नाही. |
| 3 |
| मग यशया संदेष्ट्याने हिज्कीया राजाकडे येऊन विचारले, “ही माणसे काय म्हणाली? व आपल्याकडे कोठून आली?” हिज्कीयाने उत्तर केले, “ती दूर देशाहून बाबेलहून माझ्याकडे आली होती.” |
| 4 |
| मग त्याने विचारले, “त्यांनी आपल्या घरात काय-काय पाहिले?” हिज्कीयाने म्हटले, “माझ्या घरातले सर्वकाही त्यांनी पाहिले; त्यांना माझ्या भांडागारातले दाखवले नाही असे काहीच नाही.” |
| 5 |
| तेव्हा यशया हिज्कीयाला म्हणाला, “सेनाधीश परमेश्वराचे वचन ऐक; |
| 6 |
| पाहा, असे दिवस येत आहेत की तुझ्या घरात जे काही आहे व तुझ्या वाडवडिलांनी आजवर जे साठवून ठेवले आहे, ते सर्व बाबेलास नेण्यात येईल, काही शिल्लक राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. |
| 7 |
| जे पुत्र तुला होतील, तुझ्या पोटी निर्माण होतील, त्यांच्यापैकी ज्या कोणास घेऊन जाण्यात येईल ते बाबेलच्या राजवाड्यात खोजे होऊन राहतील.” |
| 8 |
| तेव्हा हिज्कीया यशयाला म्हणाला, “तू सांगितलेले परमेश्वराचे वचन यथायोग्य आहे.” तो आणखी म्हणाला, “माझ्या काळात तरी शांतता व स्थिरता राहील.” |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/isaiah/039.mp3
66
39