पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| त्या दिवसात सात स्त्रिया एका पुरुषास धरून असे म्हणतील “आम्ही स्वतःचे अन्न मिळवू आणि स्वतःचे वस्त्र मिळवू; आम्हाला केवळ तुझे नाव चालवू दे, आणि आमची अप्रतिष्ठा घालवून दे!” |
| 2 |
| त्या दिवसात, याहवेहची शाखा सुंदर आणि गौरवशाली असेल, त्या भूमीतील पिकांचा इस्राएलातील अवशिष्टांना अभिमान व गौरव वाटेल. |
| 3 |
| सीयोनात उरलेले लोक जे यरुशलेममध्येच राहिले, त्यांची नावे नोंदवली गेली आहेत, ते पवित्र म्हणविले जातील. |
| 4 |
| प्रभू परमेश्वर सीयोनच्या स्त्रियांची घाण धुवून टाकतील; ते न्यायाच्या आत्म्याने आणि अग्नीच्या आत्म्याने यरुशलेममधील रक्ताचे डाग स्वच्छ करतील. |
| 5 |
| त्यानंतर याहवेह संपूर्ण सीयोन पर्वतावर आणि तिथे जमलेल्या सर्वांवर दिवसा धुराचा ढग आणि रात्रीच्या वेळेस प्रखर अग्नी प्रज्वलित करतील; या सर्व गोष्टींवर गौरवाचे एक छत असेल. |
| 6 |
| दिवसाच्या उष्णतेपासून ते एक आश्रय व सावली आणि वादळ व पावसापासून ते एक आश्रयस्थान आणि लपण्याचे ठिकाण असेल. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/isaiah/004.mp3
66
4