|
| 1 |
|
| मी त्याच्या क्रोधरूप दंडाचे दु:ख भोगलेला मनुष्य आहे. |
|
| 2 |
|
| त्याने मला घेऊन जाऊन, उजेडात नव्हे, तर अंधारात चालायला लावले. |
|
| 3 |
|
| खरोखर तो दिवसभर माझ्याविरुद्ध आपला हात राहून राहून चालवतो. |
|
| 4 |
|
| त्याने माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहे; त्याने माझी हाडे मोडली आहेत. |
|
| 5 |
|
| त्याने विष व दु:ख ह्यांचा कोट माझ्याभोवती रचला आहे. |
|
| 6 |
|
| जे मागेच मरून गेले त्यांच्याप्रमाणे मला तो अंधकारमय स्थळी बसवतो. |
|
| 7 |
|
| त्याने माझ्याभोवती कुंपण केले म्हणून माझ्याने बाहेर पडवत नाही; त्याने माझी बेडी भारी केली. |
|
| 8 |
|
| मी धावा करतो व गार्हाणे करतो, तेव्हा तो माझ्या विनवणीस प्रतिबंध करतो. |
|
| 9 |
|
| त्याने माझ्या मार्गाभोवती चिर्यांची भिंत बांधली आहे; त्याने माझ्या वाटा वाकड्या केल्या आहेत. |
|
| 10 |
|
| टपणार्या अस्वलासारखा, गुप्त जागी असलेल्या सिंहासारखा, तो मला झाला आहे. |
|
| 11 |
|
| त्याने मला वाटेवरून लोटून देऊन माझे फाडून तुकडे केले आहेत; त्याने मला उदास केले आहे. |
|
| 12 |
|
| त्याने आपले धनुष्य वाकवले आहे, त्याने मला बाणाचे निशाण केले आहे. |
|
| 13 |
|
| त्याने आपले बाण माझ्या अंतर्यामात शिरवले आहेत. |
|
| 14 |
|
| मी आपल्या सर्व लोकांत दिवसभर उपहासाचा व निंदाव्यंजक पोवाड्यांचा विषय झालो आहे. |
|
| 15 |
|
| त्याने मला क्लेशाने व्यापले आहे, तो मला कडू दवणा पाजतो. |
|
| 16 |
|
| त्याने मला आपल्या दातांनी खडे फोडायला लावले आहे; त्याने मला राखेने माखून काढले आहे. |
|
| 17 |
|
| तू माझ्या जिवाला शांतीपासून दूर ठेवले आहेस; समृद्धीला मी पारखा झालो आहे. |
|
| 18 |
|
| तेव्हा मी म्हणालो, “माझी जीवनशक्ती, परमेश्वराची मला वाटत असलेली आशा, गेली आहे.” |
|
| 19 |
|
| माझी विपत्ती व माझे भ्रमण, कडू दवणा व विष ह्यांचे स्मरण कर. |
|
| 20 |
|
| माझा जीव त्यांचे स्मरण करीत राहतो म्हणून तो माझ्या ठायी गळला आहे. |
|
| 21 |
|
| हे मी मनात आणतो म्हणून मला आशा आहे. |
|
| 22 |
|
| आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. |
|
| 23 |
|
| ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे. |
|
| 24 |
|
| “परमेश्वर माझा वतनभाग आहे”, असे माझा जीव म्हणतो; म्हणून त्याच्या ठायी मी आशा ठेवीन. |
|
| 25 |
|
| जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना, जो जीव त्याला शरण जातो त्याला, परमेश्वर प्रसन्न होतो. |
|
| 26 |
|
| परमेश्वरापासून येणार्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे. |
|
| 27 |
|
| मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे. |
|
| 28 |
|
| त्याने एकान्ती बसावे व स्वस्थ असावे, कारण त्याने त्याच्यावर हे ओझे ठेवले आहे. |
|
| 29 |
|
| त्याने आपले तोंड मातीत खुपसावे, कदाचित अद्यापि आशा असेल. |
|
| 30 |
|
| मारत्या इसमाकडे त्याने आपला गाल करावा; त्याने उपहास सोसावा. |
|
| 31 |
|
| कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही; |
|
| 32 |
|
| तो जरी दु:ख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करतो. |
|
| 33 |
|
| तो कोणास मुद्दाम पीडा करीत नाही, मानवपुत्रांना दु:ख देत नाही. |
|
| 34 |
|
| पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना पायांखाली तुडवणे, |
|
| 35 |
|
| परात्पराच्या समक्ष मनुष्याचे हक्क बुडवणे, |
|
| 36 |
|
| कोणाचा दावा बिघडवणे, असली कृत्ये प्रभू पाहत नाही काय? |
|
| 37 |
|
| प्रभूने आज्ञा केली नसल्यास कोण बोलला आणि त्याप्रमाणे घडून आले? |
|
| 38 |
|
| अनिष्ट व इष्ट ही परात्पराच्या मुखातून येत नाहीत काय? |
|
| 39 |
|
| आपल्या पातकांबद्दल शिक्षा होते म्हणून जिवंत मनुष्याने का कुरकुर करावी? |
|
| 40 |
|
| चला, आपण आपले मार्ग शोधू व तपासू, आणि परमेश्वराकडे परत जाऊ. |
|
| 41 |
|
| आपण आपले हात वर स्वर्गांतील देवाकडे करून आपली अंत:करणे त्याच्याकडे उन्नत करू. |
|
| 42 |
|
| “आम्ही अपराध केला व फितुरी केली; त्याची तू क्षमा केली नाहीस. |
|
| 43 |
|
| तू क्रोधव्याप्त होऊन आमचा छळ केलास तू वधलेस, दया केली नाहीस. |
|
| 44 |
|
| तू आपणा स्वत:स अभ्राने आच्छादलेस, प्रार्थनेचा त्यामधून प्रवेश होत नाही. |
|
| 45 |
|
| तू आम्हांला राष्ट्रांमध्ये हेंदर व केरकचरा केले आहेस. |
|
| 46 |
|
| आमच्या सर्व शत्रूंनी आमच्यावर आपले तोंड वासले आहे. |
|
| 47 |
|
| भय व गर्ता, विध्वंस व नाश ही आम्हांला प्राप्त झाली आहेत. |
|
| 48 |
|
| माझ्या लोकांच्या कन्येचा विनाश झाल्यामुळे माझे डोळे अश्रुप्रवाह ढाळत आहेत. |
|
| 49 |
|
| माझे डोळे वाहत आहेत, थांबत नाहीत, कधी खळत नाहीत; |
|
| 50 |
|
| परमेश्वर आकाशातून अवलोकन करीपर्यंत ते खळायचे नाहीत. |
|
| 51 |
|
| माझ्या नगरात सर्व कन्यांमुळे माझे डोळे माझ्या जिवास दुःख देत आहेत. |
|
| 52 |
|
| निष्कारण बनलेल्या माझ्या वैर्यांनी पक्ष्याचा करावा तसा माझा पाठलाग केला आहे. |
|
| 53 |
|
| गर्तेत ढकलून त्यांनी माझ्या जिवाचा अंत केला आहे, माझ्यावर दगड लोटला आहे. |
|
| 54 |
|
| माझ्या डोक्यावरून पाण्याचे लोट गेले; मी म्हणालो, ‘माझा अंत होत आहे.’ |
|
| 55 |
|
| हे परमेश्वरा, अतिशय खोल गर्तेतून मी तुझ्या नामाचा धावा केला. |
|
| 56 |
|
| तू माझी वाणी ऐकलीस; माझ्या उसाशाला; माझ्या आरोळीला, आपला कान बंद करू नकोस. |
|
| 57 |
|
| मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास; तू म्हणालास भिऊ नकोस. |
|
| 58 |
|
| हे प्रभू, तू माझ्या जिवाच्या पक्षाने लढलास; तू माझ्या जिवास उद्धरलेस. |
|
| 59 |
|
| हे परमेश्वरा, माझा अन्याय झाला तो तू पाहिला आहेस; तू माझा न्याय कर. |
|
| 60 |
|
| त्यांनी उगवलेला सर्व सूड, त्यांच्या माझ्याविषयीच्या सर्व योजना, तू पाहिल्या आहेत. |
|
| 61 |
|
| हे परमेश्वरा, माझ्याविरुद्ध त्यांनी केलेली निंदा व त्यांच्या सर्व योजना तू ऐकल्या आहेत. |
|
| 62 |
|
| माझ्यावर उठणार्यांच्या तोंडचे शब्द व दिवसभर चाललेला त्यांचा माझ्याविषयीचा कट तू ऐकला आहेस. |
|
| 63 |
|
| तू त्यांचे उठणेबसणे पाहा; मी त्यांचे उपहासगीत झालो आहे. |
|
| 64 |
|
| हे परमेश्वरा, त्यांच्या हातच्या कर्माप्रमाणे तू त्यांना प्रतिफळ देशील. |
|
| 65 |
|
| हृदयाची कठोरता हा आपला शाप तू त्यांना देशील. |
|
| 66 |
|
| तू क्रोधाने त्यांचा पाठलाग करशील, व परमेश्वराच्या आकाशाखालून तू त्यांचा विध्वंस करशील.” |
|
|
|
|