|
| 1 |
|
| याहवेहच्या क्रोध-दंडाने कशा वेदना होतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला मी मनुष्य आहे. |
|
| 2 |
|
| त्यांनी मला हाकलून लावले व प्रकाशात नव्हे तर निबिड अंधारात मला चालविले आहे; |
|
| 3 |
|
| निश्चितच त्यांनी परत परत, दिवसभर माझ्याविरुद्ध त्यांचा हात उगारला आहे. |
|
| 4 |
|
| त्यांनी माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहेत आणि त्यांनी माझी हाडे मोडली आहेत. |
|
| 5 |
|
| विषारी व कठीण परिश्रमाने हाल आणि यातना यांच्या कोंडीत पकडून माझ्याभोवती वेढा दिला आहे. |
|
| 6 |
|
| जसे दीर्घकालापूर्वीच मृत झाल्यागत त्यांनी मला अंधकारात राहण्यास सोडले आहे. |
|
| 7 |
|
| त्यांनी माझ्याभोवती भिंत बांधली, म्हणजे मी सुटून जाऊ शकणार नाही; त्यांनी मला अवजड साखळदंडानी जखडले आहे. |
|
| 8 |
|
| जरी मी एवढा धावा करतो व मदतीसाठी ओरडतो, तरी ते माझ्या प्रार्थना ऐकत नाहीत. |
|
| 9 |
|
| मोठमोठे दगड ठेऊन माझ्या मार्गात बाधा घातली आहे. त्यांनी माझी वाट आडवळणांची केली आहे. |
|
| 10 |
|
| दबा धरून बसलेल्या अस्वलाप्रमाणे, लपून बसलेल्या सिंहाप्रमाणे |
|
| 11 |
|
| त्यांनी मला माझ्या वाटेवरून ओढून नेले आणि छिन्नविछिन्न केले आणि मला तसेच असहाय्य टाकून दिले. |
|
| 12 |
|
| त्यांनी आपले धनुष्य ताणून मला आपल्या बाणाचे लक्ष्य बनविले आहे. |
|
| 13 |
|
| आणि त्यांच्या भात्यातील बाणांनी माझे अंतर्याम छेदले आहे. |
|
| 14 |
|
| मी माझ्या लोकांच्या उपहासाचा विषय झालो आहे; ते दिवसभर माझ्या चेष्टेची गीते गातात. |
|
| 15 |
|
| प्रभूने मला कडू दवण्याने भरून टाकले आहे, आणि मला आंब प्यावयास दिली आहे. |
|
| 16 |
|
| त्यांनी माझे दात खड्यांनी पाडले आहेत. त्यांनी मला धुळीत तुडविले आहे. |
|
| 17 |
|
| माझी शांती हिरावून गेली आहे; समृद्धी म्हणजे काय असते हे मी विसरलो आहे. |
|
| 18 |
|
| म्हणून मी म्हणतो, “माझे वैभव निघून गेले आहे व याहवेहकडून काहीही मिळण्याची आशा नष्ट झाली आहे.” |
|
| 19 |
|
| माझी पीडा व भटकंतीची, विषारी वनस्पती व कडू दवणा यांची मला आठवण येते. |
|
| 20 |
|
| ते माझ्या चांगलेच स्मरणात आहे, आणि त्याने माझा आत्मा अत्यंत खिन्न होतो. |
|
| 21 |
|
| तरीपण आशेचा हा एक किरण उरला आहे: |
|
| 22 |
|
| याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही. |
|
| 23 |
|
| त्यांची प्रेमदया प्रतिदिवशी नवी होते; तुमची विश्वसनीयता महान आहे. |
|
| 24 |
|
| मी स्वतःस म्हणतो, “याहवेह माझा वाटा आहेत; म्हणूनच मी त्यांची प्रतीक्षा करेन.” |
|
| 25 |
|
| जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात, आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत. |
|
| 26 |
|
| याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे हितकारक आहे. |
|
| 27 |
|
| मनुष्याने त्याच्या तारुण्यात जू वाहणे त्याच्या हितासाठी आहे. |
|
| 28 |
|
| कारण ते याहवेहनेच त्याच्यावर लादले आहे म्हणून त्याने एकांतात शांत बसावे. |
|
| 29 |
|
| त्याला त्याचे मुख धुळीत पुरू दे— तरी आशा कायम असेल. |
|
| 30 |
|
| जे त्याला चपराक मारतात, त्यांच्यापुढे त्याने दुसरा गालही करावा, आणि तो सर्व अपमानाने भरून जाऊ दे. |
|
| 31 |
|
| कारण प्रभू कोणाचाही कायमचा त्याग करत नाहीत. |
|
| 32 |
|
| जरी त्यांनी त्याला दुःख दिले, तरी ते करुणा करतात, त्यांची महान प्रेमदया अथांग आहे. |
|
| 33 |
|
| ते स्वखुशीने माणसांना पीडा देत नाहीत व त्यांना दुखवित नाहीत. |
|
| 34 |
|
| जगातील सर्व बंदिवानांना पायाखाली तुडवून चिरडणे, |
|
| 35 |
|
| परमोच्चांनी दिलेले हक्क त्यांच्यापासून हिरावून घेणे, |
|
| 36 |
|
| कोणा मनुष्याची न्याय-वंचना करणे— या गोष्टी प्रभू बघणार नाहीत काय? |
|
| 37 |
|
| प्रभूने परवानगी दिल्याशिवाय बोलून तसे घडविण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे? |
|
| 38 |
|
| अनिष्ट व इष्ट ही दोन्हीही परमोच्चाच्या मुखातून येत नाहीत काय? |
|
| 39 |
|
| आमच्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा होते, तेव्हा आम्ही जिवंत मानवांनी तक्रार का करावी? |
|
| 40 |
|
| आपण स्वतःच्या आचरणांचे निरीक्षण करू व त्यांची परीक्षा घेऊ, आणि परत याहवेहकडे वळू. |
|
| 41 |
|
| आपण स्वर्गातील परमेश्वराकडे आपले अंतःकरण आणि आपले हात उंच करू व म्हणू: |
|
| 42 |
|
| आम्ही पाप केले आणि बंड केले आणि तुम्ही त्याची क्षमा केली नाही. |
|
| 43 |
|
| “तुम्ही आपल्या संतापाने स्वतःला वेष्टिले आणि आमचा पाठलाग केला; तुम्ही निर्दयपणे संहार केला. |
|
| 44 |
|
| तुम्ही स्वतःस मेघाने आच्छादून घेतले आहे जेणेकरून कोणतीही प्रार्थना तुमच्यापर्यंत पोचू नये. |
|
| 45 |
|
| तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये केरकचरा गाळ व उकिरडा केले आहे. |
|
| 46 |
|
| “सर्व शत्रूंनी आपले मुख आमच्याविरुद्ध खूप रुंद उघडले आहे. |
|
| 47 |
|
| आम्ही दहशत व जोखिम, विनाश आणि विध्वंस यातून गेलो आहोत.” |
|
| 48 |
|
| माझ्या लोकांच्या विनाशामुळे माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह निघत आहेत. |
|
| 49 |
|
| माझे डोळे अखंडपणे, न थांबता, अश्रुपात करीत राहतील, |
|
| 50 |
|
| याहवेह स्वर्गातून खाली दृष्टी करून पाहीपर्यंत ते वाहत राहतील. |
|
| 51 |
|
| माझ्या नगरातील स्त्रियांना बघून माझे अंतःकरण पीडित होत आहे. |
|
| 52 |
|
| जे विनाकारण माझे शत्रू बनले होते, त्यांनी एखाद्या पक्ष्याप्रमाणे माझी शिकार केली आहे. |
|
| 53 |
|
| त्यांनी एका खड्ड्यात माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर दगडमार केला; |
|
| 54 |
|
| पाणी माझ्या डोक्याच्या वरपर्यंत आले, आणि मला वाटले की आता माझा नाश होणार. |
|
| 55 |
|
| याहवेह, त्या खोल डोहातून मी तुमच्या नावाचा धावा केला, |
|
| 56 |
|
| तुम्ही माझी विनंती ऐकली: “माझ्या विनवणीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका.” |
|
| 57 |
|
| मी धावा करताच तुम्ही मजजवळ आले आणि म्हणाले, “भिऊ नकोस.” |
|
| 58 |
|
| हे प्रभू, तुम्हीच माझा वाद चालविला; तुम्ही माझ्या जीवनाची खंडणी दिली. |
|
| 59 |
|
| याहवेह, माझ्यावर झालेला अन्याय तुम्ही पाहिला आहे. तुम्हीच माझी बाजू उचलून धरा! |
|
| 60 |
|
| तुम्ही माझ्याविरुद्ध असलेली सुडाची गहनता, त्यांनी रचलेले सर्व कारस्थान तुम्ही पाहिले आहे. |
|
| 61 |
|
| याहवेह, त्यांनी केलेले अपमान तुम्ही ऐकले आहेत, त्यांनी रचलेले सर्व कारस्थान— |
|
| 62 |
|
| माझे शत्रू माझ्याविरुद्ध दिवसभर काय बोलतात व काय कुजबुजतात, हे सर्व तुम्ही ऐकले आहे. |
|
| 63 |
|
| त्यांच्याकडे बघा! उभे राहून वा बसून, ते माझ्या उपहासाची गाणी गातात. |
|
| 64 |
|
| हे याहवेह, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल ते ज्यास पात्र आहेत, असे प्रतिफळ त्यांना द्या. |
|
| 65 |
|
| त्यांच्या हृदयावर आवरण टाका, तुमचा शाप त्यांच्यावर पडो! |
|
| 66 |
|
| क्रोधाने त्यांचा पाठलाग करा आणि याहवेहच्या आकाशाखालून त्यांना पूर्णपणे नाहीसे करा. |
|
|
|
|