|
| 1 |
|
| हे परमेश्वरा, आमच्यावर काय गुजरले ह्याचे स्मरण कर; आमच्या अप्रतिष्ठेकडे पाहा. |
|
| 2 |
|
| आमचे वतन परक्यांकडे गेले आहे; आमची घरे परदेशीयांच्या हाती गेली आहेत. |
|
| 3 |
|
| आम्ही पोरके, पितृहीन आहोत; आमच्या माता जशा काय विधवा आहेत. |
|
| 4 |
|
| आमचेच पाणी आम्ही पैका देऊन पितो; आमचेच लाकूड आम्हांला मोल देऊन मिळते. |
|
| 5 |
|
| आमचा छळ करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत; आम्ही शिणलो आहोत, आम्हांला विश्रांती नाही. |
|
| 6 |
|
| आमच्या पोटाला भाकर मिळण्यासाठी, आम्ही मिसरी लोकांकडे, अश्शूरी लोकांकडे हात पसरतो. |
|
| 7 |
|
| आमच्या पूर्वजांनी पाप केले, ते नाहीसे झाले आहेत. आम्ही त्यांच्या दुष्कर्माचे फळ भोगतो, |
|
| 8 |
|
| दास आमच्यावर सत्ता करतात; त्यांच्या हातातून आम्हांला सोडवणारा कोणी नाही. |
|
| 9 |
|
| रानात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत धरून आपले अन्न मिळवतो. |
|
| 10 |
|
| क्षुधेच्या तापामुळे आमची त्वचा भट्टीसारखी तप्त आहे. |
|
| 11 |
|
| त्यांनी सीयोनेतील स्त्रिया, यहूदाच्या नगरातील कुमारी, भ्रष्ट केल्या आहेत. |
|
| 12 |
|
| त्यांच्या हातांनी सरदार लटकवण्यात आले आहेत; प्रत्यक्ष वडील माणसांचा मान ठेवण्यात आला नाही. |
|
| 13 |
|
| तरुण जन जाती वाहून नेतात, पोरे लाकडाच्या ओझ्याखाली दबतात, |
|
| 14 |
|
| वेशीत वडील जन दिसत नाहीत, तरुण आपल्या गायनवादनास अंतरले आहेत. |
|
| 15 |
|
| आमच्या मनाचा हर्ष नाहीसा झाला आहे; आमचे नृत्य जाऊन शोक आला आहे. |
|
| 16 |
|
| आमच्या मस्तकीचा मुकुट पडला आहे; आम्ही पातक केले म्हणून हायहाय करीत आहोत. |
|
| 17 |
|
| ह्यामुळे आमचे हृदय खचले आहे; ह्या गोष्टीमुळे आमचे डोळे मंद झाले आहेत; |
|
| 18 |
|
| सीयोन पर्वत उजाड झाल्यामुळे त्यांतून कोल्हे फिरत असतात. |
|
| 19 |
|
| हे परमेश्वरा, तू सर्वकाळ सिंहासनारूढ असतोस, तुझे सिंहासन पिढ्यानपिढ्या आहे. |
|
| 20 |
|
| तू आम्हांला सर्वकाळ का विसरतोस? तू आम्हांला दीर्घकाळ का सोडून देतोस? |
|
| 21 |
|
| हे परमेश्वरा, तू आम्हांला आपणांकडे परत घे म्हणजे आम्ही वळू; पूर्वीचे दिवस आम्हांला पुन्हा आण. |
|
| 22 |
|
| तू आम्हांला सर्वस्वी टाकून दिले आहेस. तू आमच्यावर फार क्रोधायमान झाला आहेस. |
|
|
|
|