|
| 1 |
|
| हे याहवेह, आम्हाला काय झाले आहे यांचे स्मरण करा; आमच्या अपमानाकडे लक्ष द्या. |
|
| 2 |
|
| आमचे वतन अपरिचितांना देण्यात आले आहे, आमची घरे परकियांनी दिली आहेत. |
|
| 3 |
|
| आम्ही पितृहीन झालो आहोत, आमच्या माता विधवा झाल्या आहेत. |
|
| 4 |
|
| पिण्याचे पाणीदेखील आम्हाला विकत घ्यावे लागते; किंमत चुकविल्याशिवाय आम्हाला जळण मिळत नाही. |
|
| 5 |
|
| पाठलाग करणारे आमच्या अगदी जवळ येऊन पोचले आहेत. आम्ही अत्यंत थकलो आहोत व आम्हाला आराम असा नाहीच. |
|
| 6 |
|
| पुरेशी भाकरी मिळण्याकरिता आम्ही इजिप्तला आणि अश्शूरला स्वतःचे समर्पण केले आहे. |
|
| 7 |
|
| आमच्या पूर्वजांनी पाप केले व ते आता हयात नाहीत. आणि आम्ही त्यांची शिक्षा भोगत आहोत. |
|
| 8 |
|
| गुलाम आता आमचे धनी झाले आहेत, त्यांच्या हातातून आम्हाला सोडविणारा कोणीही नाही. |
|
| 9 |
|
| भाकरी मिळविण्यासाठी आम्हाला आमचा जीव धोक्यात घालावा लागतो, कारण निर्जन प्रदेशात तलवारीने वध होऊ शकतो. |
|
| 10 |
|
| आमची त्वचा भट्टीप्रमाणे तप्त झाली आहे, कारण भुकेमुळे आम्ही तापाळलेले आहोत. |
|
| 11 |
|
| स्त्रियांना सीयोनात भ्रष्ट करण्यात आले आहे, व कुमारिकांना यहूदीयातील नगरात. |
|
| 12 |
|
| आमच्या अधिपतींना त्यांच्या हातांवर लटकविण्यात आले आहे; आमच्या वडीलजनांचा मान राखला जात नाही. |
|
| 13 |
|
| तरुण गिरणीवर काबाडकष्ट करतात; तर किशोर लाकडाच्या भारी ओझ्यांखाली डळमळतात. |
|
| 14 |
|
| वडीलजनांनी वेशीतील बैठकी सोडून दिल्या आहेत; तरुणांनी त्यांचे संगीत बंद केले आहे. |
|
| 15 |
|
| आमच्या हृदयातील आनंद निघून गेला आहे; आमच्या नृत्यांचे रूपांतर विलापात झाले आहे. |
|
| 16 |
|
| आमच्या मस्तकावरील मुकुट धुळीत पडला आहे. धिक्कार असो आमचा, कारण आम्ही पाप केले आहे! |
|
| 17 |
|
| याकारणास्तव आमची अंतःकरणे खचली आहेत, या सर्व गोष्टींमुळे आमचे डोळे निस्तेज झाले आहेत. |
|
| 18 |
|
| सीयोन पर्वत आता ओसाड झाला आहे, तिथे आता लांडगे शिकारीसाठी संचार करतात. |
|
| 19 |
|
| हे याहवेह, तुमचे शासन सदासर्वकाळचे आहे; तुमचे राजासन पिढ्यान् पिढ्या स्थिर आहे. |
|
| 20 |
|
| मग तुम्ही आम्हाला नेहमी का विसरता? तुम्ही आमचा इतक्या दीर्घकालापर्यंत त्याग का केला? |
|
| 21 |
|
| याहवेह, तुम्ही आमचा स्वतःशी पुनः संबंध स्थापित करा, म्हणजे आम्ही तुमच्याकडे परत येऊ; पूर्वीच्या दिवसांसारखे आमच्या दिवसांना नवनिर्मित करा, |
|
| 22 |
|
| जर तुम्ही आमच्यावर मर्यादेपलिकडे क्रोधित झाला नसाल आणि आमचा कायमचा त्याग केला नसेल तर. |
|
|
|
|