पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मग परमेश्वराने मला म्हटले, “इस्राएल लोक अन्य देवांकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरतात, तरी त्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतो. त्याप्रमाणे तू पुन्हा जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिच्यावर प्रेम कर.” |
| 2 |
| मग मी पंधरा रुपये व दीड मण जव देऊन तिला आपल्यासाठी विकत घेतले. |
| 3 |
| मी तिला म्हणालो, “तू पुष्कळ दिवस माझ्याकरता स्वस्थ बसून राहा, जारकर्म करू नकोस, परपुरुषाची होऊ नकोस; मीही तुझ्याशी असाच वागेन.” |
| 4 |
| कारण पुष्कळ दिवसपर्यंत इस्राएल लोक हे राजा, सरदार, यज्ञ, पूजास्तंभ, एफोद व तेराफीम1 ह्यांवाचून बसून राहतील. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/hosea/003.mp3
14
3