पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| “चला, आपण याहवेहकडे परत जाऊ. त्यांनी आम्हाला फाडले आहे, व तेच आम्हाला बरे करतील; त्यांनी आम्हाला जखम केली आहे, व आता तेच पट्टी बांधतील. |
| 2 |
| ते आम्हाला दोन दिवसात पुनरुज्जीवन देतील; तिसर्या दिवशी ते आम्हाला पुनर्स्थापित करतील, जेणेकरून आपण त्यांच्या उपस्थितीत जिवंत राहू शकू. |
| 3 |
| चला, याहवेहचा आपण स्वीकार करू या; चला, त्यांचा स्वीकार करण्यास आपण झटू या. सूर्याचे उगविणे जसे निश्चित आहे, तसेच त्यांचे प्रकट होणे निश्चित आहे; हिवाळ्यातील पावसाप्रमाणे, पृथ्वीला सिंचन घालणाऱ्या वसंतऋतूप्रमाणे ते आमच्याकडे येतील.” |
| 4 |
| “एफ्राईमा मी तुमचे काय करू? यहूदाह मी तुमचे काय करू? कारण तुमची प्रीती सकाळच्या ढगांप्रमाणे, पहाटेच्या दवबिंदूप्रमाणे नाहीशी होते. |
| 5 |
| म्हणून माझ्या संदेष्ट्याद्वारे मी तुमचे तुकडे केले आहे, माझ्या मुखाच्या शब्दांनी तुम्हाला ठार केले— तेव्हा माझ्या न्याय सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे पुढे वाढत जातो. |
| 6 |
| कारण मला तुमची अर्पणे नव्हे, तर दया हवी आहे, आणि होमार्पण पेक्षा परमेश्वराचे ज्ञान प्रिय आहे. |
| 7 |
| आदामाप्रमाणे तुम्ही माझा करार मोडला आहे; तिथे ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले होते. |
| 8 |
| गिलआद हे दुष्कर्म करणारे शहर आहे, त्यावर रक्ताची पावले उमटली आहेत. |
| 9 |
| जसे लुटारू बळी पडणाऱ्याची वाट पाहत दबा धरून बसतात, तसेच याजकांच्या टोळ्या शेखेमाच्या वाटेवर वध करतात, ते आपल्या दुष्ट योजना पूर्ण करतात. |
| 10 |
| मी इस्राएलमध्ये एक भयानक गोष्ट पाहिली आहे: एफ्राईम वेश्याव्यवसाय करण्यास दिला आहे, इस्राएल अपवित्र झाला आहे. |
| 11 |
| “हे यहूदाह, तुझ्यासाठी हंगामाची वेळ नेमलेली आहे. “जेव्हा मी माझ्या लोकांना जुन्या दिवसात पुनर्स्थापित करेन, |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/hosea/006.mp3
14
6