“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की, इस्राएल लोक ज्या पवित्र वस्तू मला समर्पण करतात त्यांच्यापासून त्यांनी दूर राहावे आणि माझ्या पवित्र नावाला कलंक लावू नये; मी परमेश्वर आहे.
तू त्यांना सांग, पुढील पिढ्यांमध्ये तुमच्या सर्व वंशांतील जो कोणी अशुद्ध असताना इस्राएल लोकांनी परमेश्वराला समर्पित केलेल्या पवित्र वस्तूंना हात लावील त्याचा माझ्यासमोरून उच्छेद व्हावा; मी परमेश्वर आहे.
अहरोनाच्या वंशापैकी कोणी महारोगी अथवा स्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत. मृतामुळे अशुद्ध झालेल्या मनुष्याला किंवा वीर्यपात झालेल्या पुरुषाला जो कोणी स्पर्श करील,
ज्याच्या स्पर्शाने लोक अशुद्ध होतात अशा रांगणार्या प्राण्याला अथवा ज्याच्या स्पर्शाने कोणत्याही प्रकारची अशुद्धता लागेल अशा मनुष्याला जो कोणी स्पर्श करील,
याजकाची मुलगी विधवा असली अथवा नवर्याने टाकलेली असली, आणि ती विनापत्य असून तरुणपणी होती तशीच आपल्या बापाच्या घरी परत येऊन राहत असली तर तिने आपल्या बापाचे अन्न खावे; पण कोणा परक्याने ते खाऊ नये.
“अहरोन, त्याचे मुलगे व सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की, तुम्हा इस्राएल लोकांपैकी अथवा तुमच्यामध्ये राहणार्या उपर्या लोकांपैकी कोणी आपल्या नवसाच्या अथवा स्वखुशीच्या यज्ञबलीचा परमेश्वराप्रीत्यर्थ होम करील,
आपला नवस पुरा करण्यासाठी अथवा खुशीच्या अर्पणासाठी कोणी परमेश्वराप्रीत्यर्थ गुराढोरांतून किंवा शेरडामेंढरातून शांत्यर्पण करील तर ते मान्य होण्यासाठी दोषहीन असावे; त्यात काही दोष नसावा.
आंधळा, तुटलेल्या अवयवाचा, लुळा अथवा अंगावर मस, चाई अथवा खरूज असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वराला अर्पू नये किंवा वेदीवर हव्य म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ त्याचा होम करू नये.
ह्यांतील कोणतेही प्राणी परक्याच्या हातून घेऊन तुम्ही आपल्या देवासाठी अन्न म्हणून अर्पण करू नयेत; कारण ते सव्यंग व सदोष आहेत, म्हणून ते तुमच्याप्रीत्यर्थ स्वीकारले जाणार नाहीत.”
“वासरू, कोकरू अथवा करडू जन्मल्यावर ते सात दिवस आपल्या आईजवळ असले पाहिजे; आठव्या दिवसापासून पुढे ते परमेश्वराला हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी स्वीकारण्यास योग्य ठरेल.