सहा दिवस कामकाज करावे, पण सातवा दिवस परमविश्रामाचा शब्बाथ व पवित्र मेळ्याचा दिवस होय; ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये; तुमच्या सर्व घराघरांतून हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.
“इस्राएल लोकांना सांग: मी तुम्हांला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहचाल व त्यातील पीक कापाल, तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी;
त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या दोन दशमांश एफा सपिठाचे असावे; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; आणि त्याबरोबरचे पेयार्पण म्हणून एक चतुर्थांश हिन द्राक्षारस अर्पावा.
तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर किंवा हुरडा किंवा हिरवे धान्य खाऊ नये; तुमच्या सर्व घरा़घरांतून हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.
तुम्ही आपल्या निवासस्थानातून दोन दशमांश एफाभर सपिठाच्या दोन भाकरी ओवाळणीसाठी आणाव्यात. त्या खमीर घालून भाजलेल्या असाव्यात; परमेश्वराप्रीत्यर्थ हे प्रथमउपजाचे अर्पण होय.
वर्षावर्षाची सात दोषहीन कोकरे, एक गोर्हा आणि दोन मेंढे भाकरीबरोबर अर्पावेत; त्यांच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्यांच्यासह परमेश्वराप्रीत्यर्थ त्यांचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.
तुम्ही त्याच दिवशी हे जाहीर करावे की, आज आपला एक पवित्र मेळा भरणार आहे म्हणून कोणीही अंगमेहनतीचे काम करू नये; तुमच्या सर्व निवासस्थानांतून तुम्हांला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.
तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा शेताच्या कोनाकोपर्यातील सार्या पिकाची कापणी करू नका, आणि सरवा वेचू नका; गरीब व उपरे ह्यांच्यासाठी तो राहू द्या; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”
“त्याच सातव्या महिन्याच्या दशमीस प्रायश्चित्ताचा दिवस पाळावा; त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे.
त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये, कारण हा प्रायश्चित्ताचा दिवस होय; त्या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर तुमच्यासाठी प्रायश्चित्त करण्यात येईल.
तो दिवस तुम्हांला परमविश्रामाचा शब्बाथ व्हावा व तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे; त्या महिन्याच्या नवमीच्या संध्याकाळपासून दुसर्या संध्याकाळपर्यंत तुम्ही आपला शब्बाथ पाळावा.”
सात दिवस परमेश्वराला हव्य अर्पावे व आठव्या दिवशी आपला पवित्र मेळा भरवून परमेश्वराला हव्य अर्पावे; सणाचा हा समारोपदिन होय. त्या दिवशी कसलेही अंगमेहनतीचे काम करू नये.
परमेश्वराचे नेमलेले समय हे होत. त्यांत हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण त्या त्या दिवसानुसार परमेश्वराला अर्पण करण्यासाठी पवित्र मेळे भरवावेत असे तुम्ही जाहीर करावे;
जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराप्रीत्यर्थ सण पाळावा; पहिला दिवस व आठवा दिवस हे परमविश्रामदिन होत.
पहिल्या दिवशी तुम्ही चांगल्या झाडांची फळे, खजुरीच्या झावळ्या, दाट पालवीच्या झाडांच्या डाहळ्या, ओहळालगतची वाळुंजे ही आणून परमेश्वर तुमचा देव ह्याच्यासमोर सात दिवस उत्सव करावा.
म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की, मी इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर काढले तेव्हा मांडवात त्यांना राहायला लावले; मी परमेश्वर तुमचा देव आहे.” ह्याप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांना नेमलेले समय कळवले.