पण सातव्या वर्षी देशाला परमविश्रामाचा शब्बाथ असावा; म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ शब्बाथ असावा; त्या वर्षी तू शेतात पेरणी करू नये आणि द्राक्षमळ्याची छाटणी करू नये.
त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी; ह्या वर्षाला तुम्ही योबेल1 म्हणावे; ह्या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे.
योबेलवर्षानंतर जितकी वर्षे झाली असतील त्यांच्या संख्येप्रमाणे आपल्या शेजार्यापासून मोल घ्यावे, व तितक्या वर्षांच्या उत्पन्नानुसार त्यांनी विक्री करावी.
उरलेल्या वर्षांची संख्या अधिक असली तर त्या मानाने मोल वाढवावे आणि कमी असली तर त्या मानाने मोल कमी करावे, कारण जितकी पिके झाली असतील त्यांच्या हिशोबाने त्यांनी ती विक्री करावी.
तुझा कोणी भाऊबंद कंगाल झाला आणि त्याने आपल्या वतनाचा काही भाग विकला, तर त्याच्या सगळ्यात जवळच्या आप्ताने पुढे येऊन आपल्या भाऊबंदाने विकलेला भाग सोडवून घ्यावा.
पण ते वतन परत मिळवण्याची त्याला ऐपत नसली, तर आपली विकलेली जमीन विकत घेणार्याच्या ताब्यात योबेलवर्षापर्यंत राहू द्यावी; योबेलवर्षी ती सुटेल तेव्हा त्याने आपल्या वतनावर परत जावे.
एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले राहते घर विकले, तर ते विकल्यावर एका वर्षाच्या आत त्याला ते सोडवता येईल. ते सोडवण्याचा हक्क त्याला पूर्ण एक वर्ष राहील.
पूर्ण एक वर्षाच्या आत ते सोडवले नाही तर तटबंदीच्या नगरात असलेले ते घर विकत घेणार्याचे होऊन पिढ्यानपिढ्या त्याच्या वंशात कायमचे राहील; योबेलवर्षी ते सुटणार नाही;
एखाद्या लेव्याचे वतनाच्या नगरातले घर दुसर्या कोणी सोडवले, तर आपल्या वतनाच्या नगरात विकलेले ते घर योबेलवर्षी सुटेल; कारण इस्राएल लोकांमध्ये लेव्यांचे वतन म्हटले म्हणजे त्यांच्या नगरातील घरेच होत.
तुझा एखादा भाऊबंद कंगाल झाला आणि त्याच्याने काम होत नाही असे तुला दिसले तर तू त्याला आधार द्यावास. परक्याप्रमाणे अथवा उपर्याप्रमाणे त्याने तुझ्याजवळ राहावे.
ह्याशिवाय, तुमच्यामध्ये उपरे म्हणून राहणारे परदेशीय लोक आणि त्यांच्या पोटी तुमच्या देशात जन्मलेली त्यांची संतती ह्यांच्यातून तुम्ही दास व दासी खरेदी करावेत आणि ती तुमची मालमत्ता व्हावी.
त्यांचा ताबा तुम्ही आपल्यामागे आपल्या मुलांना द्यावा, व ती त्यांच्या वतनाचा भाग ठरतील; त्या लोकांतून तुम्ही कायमचे दास करून घ्यावेत, पण तुमच्या इस्राएल भाऊबंदांनी एकमेकांवर आपला अधिकार कठोरपणाने चालवू नये.
तुझा एखादा परदेशीय अथवा उपरा शेजारी धनवान झाला, व त्याच्याजवळ राहणारा तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वतःस त्या परदेशीयाला अथवा उपर्याला किंवा त्याच्या वंशातील एखाद्याला विकले असेल,
त्याचा चुलता, त्याचा चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा आप्त ह्यांना त्याला सोडवता येईल; अथवा तो स्वतःच धनवान झाला तर त्याला स्वतःची सुटका करवून घेता येईल.
ज्याने त्याला विकत घेतले असेल त्याच्याबरोबर त्याने आपल्या विक्रीच्या वर्षापासून योबेलवर्षापर्यंत हिशोब करावा; वर्षांच्या संख्येप्रमाणे विक्रीचे मोल ठरवावे; मजुराच्या रोजाप्रमाणे मोल आकारण्यात यावे.