किंवा कोणाची हरवलेली वस्तू सापडली असता तिच्याविषयी त्याने लबाडी करून खोटी शपथ वाहिली, अशा ज्या गोष्टी करून लोक पाप करतात त्यांपैकी एखादी करून कोणी अपराधी ठरला,
म्हणजे असले पाप करून दोषी झाला तर त्याने लूट करून किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते, किंवा आपल्याजवळची कोणाची ठेव बुडवली असेल ती, किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्याला सापडली असून त्याने परत केली नसेल ती,
किंवा ज्या एखाद्या वस्तूच्या बाबतीत त्याने खोटी शपथ वाहिली असेल ती त्याने पुरी भरून द्यावी. ज्या वस्तूचा त्याने अपहार केला असेल तिची पुरी भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन वर आणखी तिचा एक पंचमांश भाग त्याने द्यावा.
“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना आज्ञा कर की, होमार्पणाचा विधी असा: होमबली वेदीवरील अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा, आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा.
वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये; याजकाने त्याच्यावर रोज सकाळी लाकडे घालून तो पेटता ठेवावा आणि त्याच्यावर होमबली रचून शांत्यर्पणांच्या चरबीचा होम करावा.
त्या अन्नार्पणातून मूठभर सपीठ, थोडे तेल व त्यावरील सगळा धूप घेऊन अन्नार्पणाचा स्मारकभाग म्हणून परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास व्हावा म्हणून त्यांचा वेदीवर होम करावा.
खाण्याचा हक्क अहरोनाच्या संतानांतील प्रत्येक पुरुषाला आहे; परमेश्वराच्या हव्यातून हा त्यांचा वाटा पिढ्यानपिढ्या निरंतर चालू राहावा; ह्या हव्यास जो कोणी स्पर्श करील तो पवित्र आहे.”
“अहरोनाला अभिषेक होईल त्या दिवशी त्याने आपल्या मुलांसह परमेश्वराला जे अर्पण करायचे ते हे: एक दशांश एफा सपीठ नित्याचे अन्नार्पण म्हणून द्यावे व त्यापैकी अर्धे सकाळी व अर्धे संध्याकाळी अर्पावे.