पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना केली; |
| 2 |
| तो म्हणाला, “मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले; अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकलास. |
| 3 |
| तू मला डोहात, समुद्राच्या पोटात टाकलेस, प्रवाहाने मला व्यापले; तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले. |
| 4 |
| मी म्हणालो, ‘तुझ्या दृष्टिवेगळे मला फेकून दिले आहे; तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन.’ |
| 5 |
| जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले, डोहाने चोहोकडून मला घेरले; समुद्रातील शेवाळाने माझे डोके वेष्टले. |
| 6 |
| मी खाली पर्वतांच्या तळी गेलो होतो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते; तरी परमेश्वरा, माझ्या देवा, तू गर्तेतून माझा जीव उद्धरला आहेस. |
| 7 |
| माझा जीव माझ्या ठायी व्याकूळ झाला तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले; माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहचली. |
| 8 |
| जे निरर्थक मूर्तींना भजतात, ते आपल्या दयाघनास सोडून देतात; |
| 9 |
| पण मी तुला आभारप्रदर्शनाचे यज्ञ करीन; मी केलेले नवस फेडीन; तारण परमेश्वरापासून होते.” |
| 10 |
| परमेश्वराने माशाला आज्ञा केली, तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकले. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/jonah/002.mp3
4
2