पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| मी आपले डोळे वर करून पाहिले तर पाहा, एक मनुष्य हातात मापनसूत्र घेऊन उभा आहे. |
| 2 |
| तेव्हा मी विचारले, “तू कोठे जात आहेस?” तो मला म्हणाला, “यरुशलेमेचे माप घेण्यास म्हणजे तिची लांबीरुंदी पाहण्यास मी जात आहे.” |
| 3 |
| आणि पाहा, माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत जाऊ लागला तेव्हा दुसरा दिव्यदूत त्याला भेटण्यास आला. |
| 4 |
| तो त्याला म्हणाला, “धावत जाऊन त्या तरुणास असे सांग, ‘यरुशलेमेत माणसे व गुरेढोरे फार झाल्यामुळे भिंती नसलेल्या खेड्यांप्रमाणे तिच्यात वस्ती होईल. |
| 5 |
| परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन, व तिच्या ठायी मी तेजोरूप होईन.”’ |
| 6 |
| अहो, तुम्ही उत्तरेकडील देशाहून पळून या, असे परमेश्वर म्हणतो; मी तर तुम्हांला आकाशातील चार्ही वार्यांप्रमाणे चोहोकडे विखरले आहे, असे परमेश्वर म्हणतो. |
| 7 |
| अगे सीयोने, बाबेलकन्येबरोबर राहणारे, आपला बचाव कर. |
| 8 |
| ज्या राष्ट्रांनी तुम्हांला लुटले त्यांच्याकडे प्रताप मिळवण्यासाठी,1 त्याने मला पाठवले आहे; जो कोणी तुम्हांला स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील; कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो: |
| 9 |
| “पाहा, मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, व त्यांची सेवा करणारे त्यांना लुटतील; तेव्हा तुम्हांला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला पाठवले आहे. |
| 10 |
| हे सीयोनकन्ये जयजयकार व उल्लास कर; कारण पाहा, मी येईन, मी तुझ्यात वस्ती करीन, असे परमेश्वर म्हणतो. |
| 11 |
| त्या दिवसांत बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील; मी तुझ्या ठायी वस्ती करीन, मग तुला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे. |
| 12 |
| परमेश्वर पवित्र भूमीतला आपला वाटा म्हणून यहूदाचा ताबा घेईल व पुन्हा यरुशलेम निवडील.” |
| 13 |
| सर्व मानवहो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/zechariah/002.mp3
14
2