म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि त्याने व त्याच्या बरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत तर फक्त याजकांनी खाव्यात अशा समर्पित भाकरी त्यांनी कशा खाल्ल्या, हे तुम्ही वाचले नाही काय?
तो त्यांना म्हणाला, “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, ज्याचे एकच मेंढरू असेल आणि साबाथ दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही?
पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे, तो मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी मी प्रसन्न आहे, त्याच्यावर मी माझा आत्मा पाठवीन व तो परराष्ट्रीयांना माझा न्याय कळवील.
त्याने त्यांच्या मनातील विचार ओळखून त्यांना म्हटले, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा कुटुंब टिकत नाही.
म्हणून मी तुम्हांला सांगतो, प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांबद्दल माणसांना क्षमा मिळेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे, त्याबद्दल क्षमा मिळणार नाही.
मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल, तर त्याबद्दल त्याला क्षमा मिळेल. परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल, त्याबद्दल त्याला आताच्या किंवा येणाऱ्या युगातही क्षमा मिळणार नाही.
निनवेचे लोक ह्या पिढीबरोबर न्यायकाळी उठून तुम्हांला दोषी ठरवतील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे.
दक्षिणेची राणी न्यायाच्या दिवशी ह्या पिढीबरोबर उठून तुम्हांला दोषी ठरवील; कारण ती शलमोनचे ज्ञान ऐकायला तिच्या देशातून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा कोणी येथे आहे.
नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आत्मे आपल्याबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे वस्ती करतात. अर्थात, त्या माणसाची दशा पूर्वीपेक्षा अधिक वाईट होते. तसेच ह्या दुष्ट पिढीचेही होईल.”