नंतर असे झाले की, तो त्याच्या घरी जेवायला बसला; तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस बसले; कारण ते पुष्कळ असून त्याच्यामागे आले होते.
तेव्हा परूश्यांतील शास्त्री ह्यांनी त्याला जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर जेवताना पाहून त्याच्या शिष्यांना म्हटले, “हा जकातदार व पापी लोक ह्यांच्या-बरोबर का जेवतो?”
हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते; मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”
योहानाचे शिष्य व परूशी उपास करत होते; तेव्हा लोक येऊन त्याला म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूश्यांचे शिष्य उपास करतात पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्याचे कारण काय?”
कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांत घालत नाही; घातला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो व बुधलेही निकामी होतात; म्हणून नवा द्राक्षारस नव्याच बुधल्यांत घालतात.”
अब्याथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला व याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या ‘समर्पित भाकरी’ त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबरच्यांनाही कशा खाण्यास दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय?”