आम्ही इटाली देशाला तारवातून जावे असे ठरल्यावर, पौलाला व दुसऱ्या कित्येक बंदिवानांना बादशाही पलटणीचा यूल्य नावाचा रोमन अधिकारी ह्याच्या ताब्यात देण्यात आले.
आम्ही आशिया प्रांताच्या किनाऱ्यावरील बंदरास जाणाऱ्या अद्रमुत्तीय नगराच्या एका तारवात बसून निघालो, तेव्हा मासेदोनियाचा थेस्सलनीकातील रहिवासी अरिस्तार्ख आमच्याबरोबर होता.
दुसऱ्या दिवशी आम्ही सीदोन येथे पोहचलो. तेथे यूल्य पौलाबरोबर सौजन्याने वागला. त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्यांच्याकडे जाण्यास त्याला परवानगी दिली.
ते बंदर हिवाळ्यात राहावयाला सोयीचे नव्हते म्हणून बहुतेकांनी तेथून निघावे आणि साधेल तर फैनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा, अशी इच्छा प्रदर्शित केली. क्रेतमधील ह्या बंदराचे तोंड नैऋत्य व वायव्य दिशांकडे होते.
ती वर घेतल्यावर त्यांनी दोरांनी तारू खालून आवळून बांधले. आपण सुर्ती किनाऱ्याच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यांना भय वाटले म्हणून त्यांनी शीड उतरले, मग तारू तसेच वाहवत गेले.
त्यांना पुष्कळ दिवस उपवास घडल्यावर पौल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, “गृहस्थहो, खरेच, तुम्ही माझे ऐकावयाला हवे होते. क्रेत बेटावरून निघावयाचे नव्हते म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती.
नंतर चौदाव्या रात्रीस भूमध्य समुद्रात आम्ही इकडे तिकडे हेलकावे खात असता मध्यरात्रीच्या सुमारास खलाशांनी अनुमान केले की, आपण कोणत्या तरी किनाऱ्याजवळ येत आहोत.
दिवस उगवल्यावरही ते स्थळ कोणते, हे त्यांनी ओळखले नाही, पण एक खाडी व तिचा सपाट किनारा हे त्यांच्या दृष्टीस पडले आणि साधेल तर त्यावर तारू लावावे असा विचार त्यांनी केला.
तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने रोमन अधिकारी त्यांच्या बेतास आडवा आला आणि त्याने हुकूम दिला, “ज्यांना पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून किनाऱ्यास जावे.