पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| आता प्रभूच्या लोकांना आर्थिक मदत करण्याबद्दल: गलातीया येथील मंडळ्यांना मी जे करावयास सांगितले ते तुम्हीही करा. |
| 2 |
| प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी, तुम्हातील प्रत्येकाने मिळालेल्या उत्पन्नातून काही रक्कम बाजूला काढून, साठवून ठेवावी, म्हणजे मी तिथे आल्यानंतर वर्गण्या गोळा कराव्या लागणार नाहीत. |
| 3 |
| मग, मी तिकडे आल्यावर, तुम्ही स्वतः निवडलेले लोक व ओळख करून देणारी माझी पत्रे आणि तुमची प्रेमाची देणगी घेऊन मी त्यांना यरुशलेमला पाठवेन. |
| 4 |
| मीही जाणे उचित होईल असे वाटले, तर आम्ही सोबतीने प्रवास करू. |
| 5 |
| मासेदोनियामधून गेल्यानंतर, मी तुम्हाकडे येईन कारण मीही मासेदोनियामधून जाण्याचा विचार करत आहे. |
| 6 |
| तेव्हा मी तुमच्याबरोबर बहुतेककरून अधिक काळ, कदाचित हिवाळादेखील घालवेन. मग मी जिथे कुठे जाईन, तिथे माझी रवानगी करण्यात मला तुम्ही मदत करू शकता. |
| 7 |
| यावेळी तुम्हाला धावती भेट द्यावी आणि पुढे जावे अशी माझी इच्छा नाही; तर प्रभूची इच्छा असेल तर तुमच्याकडे येऊन काही काळ तुमच्याबरोबर राहावे अशी माझी इच्छा आहे. |
| 8 |
| पण पन्नासाव्या दिवसाच्या सणापर्यंत मी येथेच म्हणजे इफिसमध्ये राहणार आहे. |
| 9 |
| कारण माझ्यासाठी चांगले व प्रभावी सेवेचे द्वार उघडले गेले आहे. परंतु तिथे मला विरोध करणारे देखील पुष्कळच आहेत. |
| 10 |
| तीमथ्य तुमच्याकडे आला, तर तुमच्याबरोबर असताना त्याला भिण्याची गरज नाही असे त्याला कळू द्या, माझ्यासारखाच तोही प्रभूचे सेवाकार्य करीत आहे. |
| 11 |
| कोणीही त्याला कमी लेखू नये, शांती प्राप्त झालेला असा त्याला माझ्याकडे परत पाठवा. जे आणखी बंधू इकडे येणार आहेत, त्यांच्याबरोबरच त्यालाही भेटण्यास मी उत्सुक आहे. |
| 12 |
| आता बंधू अपुल्लोसासंबंधी: त्याने बंधुजनांबरोबर तुमच्याकडे येण्याची मी त्याला खूप विनंती केली. परंतु आताच तुम्हाकडे यावे अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती, परंतु संधी मिळेल तेव्हा तो येईल. |
| 13 |
| जागृत राहा; विश्वासात स्थिर राहा; धैर्याने वागा व खंबीर असा. |
| 14 |
| तुम्ही जे काही करता ते प्रीतीने करा. |
| 15 |
| तुम्हाला माहीत आहे की स्तेफन आणि त्याचे कुटुंब हे अखया प्रातांमधील पहिले विश्वासू आहेत आणि प्रभूच्या लोकांसाठी सेवाकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले आहे. बंधू व भगिनींनो मी तुम्हालाही विनंती करतो, |
| 16 |
| की जे कोणी साहाय्य आणि श्रम करतात अशा लोकांच्या स्वाधीन राहा. |
| 17 |
| स्तेफन, फर्तूनात व अखायिक यांच्या येण्याने मला फार आनंद झाला. त्यांच्यामुळे तुमच्यावतीने जे काही कमी होते त्यांची त्यांनी भरपाई केली. |
| 18 |
| त्यांनी मला व तुमच्या आत्म्याला खूपच उल्लासित केले आहे. अशा लोकांना मान्यतेची आवश्यकता आहे. |
| 19 |
| आशिया प्रांतातील मंडळ्या तुम्हाला शुभेच्छा पाठवितात. अक्विला व प्रिस्किल्ला, व त्यांच्या घरात जमणारी मंडळी तुम्हाला प्रभूमध्ये शुभेच्छा सांगतात. |
| 20 |
| तसेच सर्व बंधू व भगिनी तुम्हाला शुभेच्छा देतात. एकमेकांचे पवित्र चुंबनाने अभिवादन करा. |
| 21 |
| आता या पत्रातील शुभेच्छा मी पौल, स्वतःच्या हातांनी लिहित आहे. |
| 22 |
| जो कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही, तो शापित असो. हे प्रभू या! |
| 23 |
| प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हावर असो. |
| 24 |
| तुम्हा सर्वांना ख्रिस्त येशूंमध्ये माझी प्रीती असो. आमेन. |
|
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/1corinthians/016.mp3
16
16