स्वतः ख्रिस्ताने हे पत्र लिहिले असून आमच्याद्वारे ते तुमच्याकडे पाठविण्यात आले. हे पत्र शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने दगडी पाट्यांवर नव्हे तर मानवी हृदयावर लिहिलेले आहे.
ज्याचा लेख दगडांवर कोरलेला असून ज्याचा शेवट मृत्यूत होत असे, ते सेवाकार्य एवढे तेजस्वी होते की, मोशेच्या मुखावरचे तेज नाहीसे होत चालले असतानाही इस्राएली लोकांना जर त्याच्या मुखाकडे टक लावून पाहवेना,
परंतु त्यांची मने खरोखर कठोर झाली आणि आजतागायत जुना करार वाचून दाखविण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन तसेच न काढलेले आढळते. जेव्हा मनुष्य ख्रिस्ताशी जोडला जातो तेव्हा हे आच्छादन दूर केले जाते.
मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्व जण, आरशातून प्रतिबिंबित होते त्याप्रमाणे प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करतो आणि पवित्र आत्म्याकडून येत असलेले हे वैभव आपल्याला प्रभूबरोबर अधिकाधिक एकरूप करीत आहे.