तुझा देव परमेश्वर ज्या राष्ट्रांचा देश तुला देत आहे त्यांचा त्याने संहार केल्यावर तू त्यांच्या देशाचा ताबा घेशील आणि त्यांच्या नगरांत व घरांत वस्ती करशील,
मनुष्यवध करणार्याने तेथे पळून जाऊन आपला प्राण वाचवण्याची केलेली सोय अशी: पूर्वीचे वैर नसताना जर कोणी चुकून आपल्या शेजार्याला ठार मारले, तर त्याने तेथे जावे.
उदाहरणार्थ, एखादा मनुष्य आपल्या शेजार्याबरोबर लाकडे तोडायला रानात गेला आणि झाड तोडताना त्यावर त्याने कुर्हाडीचा घाव घातला व ती दांड्यातून निसटून त्याच्या शेजार्याला लागली व तो मेला तर त्या माणसाने त्यांतल्या एका नगरात पळून जाऊन आपला प्राण वाचवावा.
अशी नगरे नसली तर त्याला फार दूर जावे लागेल आणि रक्तपाताबद्दल सूड घेणारा रागाच्या भरात त्याला गाठून मारून टाकील. खरे पाहता तो प्राणदंडास पात्र नाही, कारण पूर्वी त्याचे त्याच्याशी वैर नव्हते.
तुझा देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर आणि त्याच्या मार्गांनी निरंतर चाल, अशी आज्ञा मी आज तुला देत आहे. ती सर्व तू काळजीपूर्वक पाळली व तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती त्याप्रमाणे त्याने तुझी देशमर्यादा वाढवली, आणि तुझ्या पूर्वजांना देऊ केलेला सगळा देश तुला दिला, तर ह्या तीन नगरांशिवाय आणखी तीन नगरे तू राखून ठेव;
तथापि कोणी आपल्या शेजार्याशी दावा धरून त्याच्या घातासाठी टपला आणि त्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला व तो मेला आणि मग त्यांतल्या एका नगरात पळून गेला,
तुला मिळणार्या वतनात, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला वतन म्हणून देत आहे त्यात पूर्वीच्या लोकांनी ठरवलेली आपल्या शेजार्याच्या सीमेची खूण सरकवू नकोस.
एखाद्याने काही गुन्हा किंवा अन्याय केला आणि त्याने केलेल्या त्या अपराधाबद्दल त्याच्याविरुद्ध एकच साक्षीदार पुढे आला तर चालणार नाही; दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या साक्षीनेच कोणताही आरोप शाबीत व्हावा.