तुझा बांधव जवळपास राहत नसला किंवा तू त्याला ओळखत नसलास तर ते जनावर आपल्या घरी आण, आणि तुझा बांधव त्याचा शोध करीत येईपर्यंत ते तुझ्याजवळ राहू दे; आणि मग ते त्याच्या हवाली कर.
तसेच आपल्या बांधवाच्या गाढवाच्या बाबतीत कर; आणि तसेच त्याच्या वस्त्राबाबतीत कर; आणि आपल्या बांधवाची कोणतीही वस्तू हरवली आणि ती तुला सापडली तर तिच्या बाबतीतही तसेच कर; ती पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस.
स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही वस्त्र घालू नये, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला तसे करणार्या प्रत्येकाचा वीट आहे.
वाटेने जाताना झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे कोटे तुला आढळले, मग त्यात पिले असोत किंवा अंडी असोत, त्या पिलांवर अथवा अंड्यांवर मादी बसलेली असली तर तिला पिलांसहित धरू नकोस;
आपल्या द्राक्षमळ्यात दुसरे कोणतेही बी पेरू नकोस, पेरलेस तर सबंध उत्पन्न म्हणजे पेरलेल्या बीचे उत्पन्न आणि द्राक्षाचे उत्पन्न दोन्ही जप्त करण्यात येतील.
आणि त्याने तिच्यावर भलभलते आरोप ठेवून तिची बदनामी करून म्हटले की, ‘मी ह्या स्त्रीशी लग्न करून तिच्यापाशी गेलो तेव्हा तिच्या ठायी मला कौमार्यचिन्हे आढळली नाहीत;’
पाहा, तो तिच्यावर भलभलते आरोप ठेवून म्हणतो की, तुमच्या कन्येच्या ठायी मला कौमार्यचिन्हे आढळली नाहीत; पण ही पाहा माझ्या मुलीची कौमार्यचिन्हे.’ मग त्यांनी ती चादर गावच्या वडीलवर्गापुढे पसरावी;
त्याच्याकडून शंभर शेकेल रुपे दंडादाखल वसूल करून मुलीच्या बापाला द्यावे, कारण त्याने एका इस्राएल कन्येची बदनामी केली आहे; त्याने तिला बायको म्हणून नांदवले पाहिजे, तिचा त्याग त्याने आमरण करता कामा नये.
वडीलवर्गाने त्या मुलीला तिच्या बापाच्या घराबाहेर काढावे आणि गावच्या पुरुषांनी तिला मरेपर्यंत दगडमार करावा; कारण तिने आपल्या बापाच्या घरी वेश्याकर्म करून इस्राएलात भ्रष्टाचार केला आहे; ह्याप्रमाणे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.
एखादा पुरुष विवाहित स्त्रीशी गमन करताना सापडला तर तिच्याशी गमन करणारा पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही जिवे मारावे; अशा प्रकारे इस्राएलातून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.
तर त्या दोघांनाही त्या गावाच्या वेशीकडे आणून मरेपर्यंत दगडमार करावा म तिने गावात असून आरडाओरड केली नाही म्हणून तिला आणि त्याने आपल्या शेजार्याची स्त्री भ्रष्ट केली म्हणून त्याला; ह्या प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.
पण त्या कुमारीला काही करू नये; मरणदंडास पात्र असा काही गुन्हा तिच्या हातून घडलेला नाही; कारण एखाद्याने आपल्या शेजार्यावर चालून जाऊन त्याला जिवे मारावे तसाच हा प्रकार समजावा.
तर तिच्याशी गमन करणार्या पुरुषाने मुलीच्या बापाला पन्नास शेकेल रुपे द्यावे आणि ती त्याची बायको व्हावी; कारण त्याने तिला भ्रष्ट केले आहे. त्याने आमरण तिचा त्याग करता कामा नये.