पवित्र शास्त्र RV (Re-edited)
|
| 1 |
| तर सर्वांत प्रथम हा बोध मी करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी; |
| 2 |
| राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकार्यांकरता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. |
| 3 |
| हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारण्यास योग्य आहे. |
| 4 |
| त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे. |
| 5 |
| कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. |
| 6 |
| त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले ह्याची साक्ष यथाकाळी द्यायची आहे. |
| 7 |
| ह्या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित (मी ख्रिस्ताठायी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही), विश्वास व सत्य ह्यांसंबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले. |
| 8 |
| प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. |
| 9 |
| तसेच स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणांस भीडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; केस गुंफणे आणि सोने, मोती व मोलवान वस्त्रे ह्यांनी नव्हे, |
| 10 |
| तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांना शोभते तसे सत्कृत्यांनी आपणांस शोभवावे. |
| 11 |
| स्त्रीने सर्वस्वी अधीनतेने निमूटपणे शिकावे. |
| 12 |
| स्त्रीला शिकवण्याची अथवा पुरुषावर धनीपणा चालवण्याची परवानगी मी देत नाही; तिने निमूटपणे बसावे. |
| 13 |
| कारण प्रथम आदाम घडला गेला, नंतर हव्वा; |
| 14 |
| आणि आदाम भुलवला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली. |
| 15 |
| तथापि मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रता ह्यांत त्या राहिल्यास बालकाला1 जन्म देण्याच्या योगे2 त्यांचे तारण होईल. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathi2015/1timothy/002.mp3
6
2