पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
|
| 1 |
| सर्वांत प्रथम मी असे आवाहन करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना व मध्यस्थी करावी आणि आभार मानावेत. |
| 2 |
| राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता प्रार्थना करावी, ह्यासाठी की, पूर्ण भक्तीने व सदाचाराने आपण स्वस्थपणाचे व शांतीचे आयुष्यक्रमण करावे. |
| 3 |
| हे योग्य असून देव आपला तारणारा त्याला हे आवडते. |
| 4 |
| त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या ज्ञानाप्रत पोहचावे. |
| 5 |
| कारण देव एक आहे आणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एक मध्यस्थ आहे. |
| 6 |
| त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला अर्पण केले. परमेश्वराला सर्वांचे तारण हवे आहे, याचे हे योग्य समयी दाखविलेले प्रमाण आहे |
| 7 |
| आणि ह्याकरिता मला संदेशहर व प्रेषित आणि यहुदीतरांसाठी श्रद्धा व सत्याच्या बाबतीत शिक्षक नेमण्यात आले होते. |
| 8 |
| ख्रिस्तमंडळीमधल्या प्रत्येक उपासनेत पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. |
| 9 |
| तसेच स्त्रियांनी सभ्यतेने व समंजसपणे उचित वेशभूषा करून भिडस्तपणाने व मर्यादेने स्वतःला अलंकृत करावे. विचित्र केशभूषा, सोने, मोती व अतिमौल्यवान वस्त्रे ह्यांनी नव्हे, |
| 10 |
| तर धार्मिक म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास अलंकृत करावे. |
| 11 |
| स्त्रियांनी शांतपणे व पूर्ण अधीनतेने शिकावे. |
| 12 |
| स्त्रीला शिकविण्याची अथवा पुरुषावर अधिकार गाजविण्याची परवानगी मी देत नाही, तिने मौन बाळगून बसावे; |
| 13 |
| कारण प्रथम आदामची निर्मिती झाली, नंतर हव्वेची |
| 14 |
| आणि आदाम भुलविला गेला नाही, तर स्त्री भुलून अपराधात सापडली. |
| 15 |
| तथापि विश्वास, प्रीती, पवित्रता व मर्यादा ह्यांत टिकून राहिल्यास बालकांना जन्म देण्यामुळे तिचे तारण होईल. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathibsi/1timothy/002.mp3
6
2