पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
|
| 1 |
| तर सर्वात प्रथम मी विनंती करतो की, सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकारस्तुती करावी. |
| 2 |
| अशाच प्रकारे राजांसाठी आणि अधिकार्यांसाठी करावी, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे आयुष्यक्रमण करावे. |
| 3 |
| असे करणे चांगले आहे आणि यामुळे परमेश्वर आपल्या तारणार्याला संतोष होतो. |
| 4 |
| कारण सर्वांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्याचे ज्ञान समजावे अशी त्यांची इच्छा आहे: |
| 5 |
| कारण एकच परमेश्वर आहे आणि परमेश्वर व मनुष्य यामध्ये मनुष्य ख्रिस्त येशू हेच एकमेव मध्यस्थ आहे. |
| 6 |
| त्यांनी सर्वांसाठी स्वतःला खंडणी म्हणून दिले ही साक्ष नेमलेल्या काळी देणे होय. |
| 7 |
| आणि या उद्देशाने त्यांनी मला या साक्षीसाठी घोषणा करणारा आणि प्रेषित म्हणून नियुक्त केले—मी खरे बोलतो, खोटे बोलत नाही—आणि गैरयहूदीयांचा विश्वासू आणि खरा शिक्षक म्हणून नेमलेला आहे. |
| 8 |
| म्हणून सर्वठिकाणी पुरुषांनी राग आणि वादविवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे. |
| 9 |
| स्त्रियांनीही वागणुकीत शांत, समजूतदार, आदरणीय आणि वस्त्रे प्रावरणांत संयमी असावे. वेशभूषा, सोने किंवा मोती किंवा मोलवान पोशाख यामध्ये नव्हे, |
| 10 |
| तर जे परमेश्वराची भक्ती करणार्यांना शोभेल, अशा आचरणामुळे त्यांच्याकडे लक्ष वेधले जावे. |
| 11 |
| स्त्रियांनी शांतपणे व नम्रतेने शिकावे. |
| 12 |
| स्त्रियांनी पुरुषांना शिकवावे किंवा त्यांच्यावर अधिकार गाजवावा, याला मी परवानगी देत नाही; परंतु त्यांनी शांत राहावे. |
| 13 |
| कारण आदाम प्रथम घडविला गेला आणि नंतर हव्वा. |
| 14 |
| आणि सैतानाने आदामाला फसविले नाही; फसविली गेली ती स्त्री आणि ती पापी ठरली. |
| 15 |
| म्हणून मुलांना जन्म देताना तिचे तारण होईल, ती नेमस्तपणाने विश्वास, प्रीती आणि पवित्रपण यामध्ये राहिल्याने हे होईल. |
| टिपा जतन करा |
https://beblia.bible:81/BibleAudio/marathimrcv/1timothy/002.mp3
6
2