तो आपल्या आईला म्हणाला, “तुझी अकराशे शेकेल चांदीची नाणी कोणीतरी चोरली असे तुला वाटत होते त्याबद्दल तू चोराला शाप देत होतीस ती चांदीची नाणी मीच चोरली होती.” तेव्हा त्याची आई म्हणाली, “माझ्या मुला, याहवेह तुला आशीर्वाद देवो!”
जेव्हा त्याने ती अकराशे चांदीची नाणी त्याच्या आईला परत दिली, ती म्हणाली, “माझ्या मुलाने चांदीने मढविलेली प्रतिमा बनवण्यासाठी मी माझी चांदी याहवेहला समर्पित करते. मी ते तुला परत देईन.”
जेव्हा त्याने चांदी त्याच्या आईला परत केली, तिने दोनशे शेकेल चांदी घेतली आणि रौप्यकाराला दिली, जो त्याद्वारे मूर्ती बनवित असे. आणि ती मीखाहच्या घरात ठेवण्यात आली.
आता ही व्यक्ती मीखाहचे एक देवघर होते आणि त्याच्याजवळ एक एफोद आणि काही कुलदेवता होत्या आणि आपल्या पुत्रांपैकी एकाची त्याने पुरोहित म्हणून प्रतिष्ठापना केली.
त्यावर मीखाह लेवीला म्हणाला, “तू माझ्यासोबत राहा आणि माझ्या पित्याचे आणि पुरोहिताचे कर्तव्य पार पाड. आणि मी तुला वर्षाचे दहा शेकेल चांदीचे नाणे, एकजोड कपडे आणि अन्न देईल.”