× भाषा युरोप रशियन बेलारूसी युक्रेनियन पोलिश सर्बियन बल्गेरियन स्लोव्हाकियन झेक रोमानियन मोल्डोव्हियन अझरबैजान अर्मेनियन जॉर्जियन अल्बेनियन आवार बश्कीर टाटर चेचन स्लोव्हेनियन क्रोएशियन एस्टोनियन लाटवियन लिथुआनियन हंगेरियन फिनिश नार्वेजियन स्वीडिश आइसलँडिक ग्रीक मॅसेडोनियन जर्मन बवेरियन डच डॅनिश वेल्श गेलिक आयरिश फ्रेंच बास्क कॅटलन इटालियन गॅलेशियन रोमानी Bosnian उत्तर अमेरीका इंग्रजी दक्षिण अमेरिका स्पॅनिश पोर्तुगीज ग्वाराणी क्वेचुआन आयमारा मध्य अमेरिका जमैकन नहुआटल Kiche किक्की हैतीयन पूर्व आशिया चीनी जपानी कोरियन मंगोलियन उइघूर ह्मॉन्ग आग्नेय आशिया मलेशियन बर्मा हखा चिन नेपाळी सिबूआनो टागालॉग कंबोडियन थाई इंडोनेशियन व्हिएतनामी जावानीस लाओ इबान आययू मीन कचिन लहू Aceh Balinese Bugis Pampanga Sasak Shan Waray दक्षिण आशिया हिंदी ऑडिआ अवधी मिझो कन्नड मल्याळम मराठी गुजराती तामिळ तेलगू पंजाबी कुरुख आसामी मैथिली बंगाली उर्दू सिंहला डोगरी हरयाणवी मीतेई कोंकणी संताली सिंधी कोया थाडो संस्कृत देवनागरी Adilabad Gondi Ahirani बालोची Bundeli Chhattisgarhi Garhwali Kangri Kumaoni Mewari Munda Sadri Seraiki Shekhawati Sylheti मध्य आशिया किर्गिझ उझ्बिक ताजिक तुर्कमेन कझाकस्तान करकल्पक मध्य पूर्व तुर्कीश हिब्रू अरेबिक फारसी कुर्दिश पश्तो कॉप्टिक आफ्रिका आफ्रिकान्स झॉसा झुलु एनडेबेले सोथो अम्हारिक वोलयटा नायजेरियन मोसी इका दिंका कबीले ईव स्वाहिली मोरोक्को सोमालियन शोना मादागास्कर इग्बो लिंगाला बाउले सिसवती सोंगा त्सवाना गॅम्बिया योरूबा कंबा किन्यारवांडा हौसा चेवा लुओ मकुआ ड्युला फुलफुलदे कॅलेंजिन किकुयू किकवांगो किरुंडी क्रिओ नायजेरियन पिडगिन ओरोमो शिलुबा त्शिवेंदा ट्वी उंबंडू लुगबारा लुगुरु पुलर गुस्सी मासाई तुर्काना मोबा न्युअर शिल्लुक तमशेक माकोंडे Bemba Fon Hadiyya Ibibio Kimbundu Kimiiru Lango Liberian Kreyol Lomwe Mende Morisyen Ndau Nyankole Sena Sidamo Soga Songe Sukuma Tarifit Teso Tiv Zande ऑस्ट्रेलिया खंड न्युझीलँड पापुआ न्यू गिनी जुन्या भाषा अॅरेमिक लॅटिन एस्पेरांतो 1 1 1 २०१८ MRCV २०२२IRV MAR २०१९२०१८२०१५२००६1 1 1 इब्री मॅथ्यूमार्कलूकजॉनकायदेरोमन्स१ करिंथकर२ करिंथकरगलतीकरइफिसियन्सफिलिपीन्सकलस्सियन१ थेस्सलनीकाकर२ थेस्सलनीकाकर१ तीमथ्य२ तीमथ्यटायटसफिलेमोनइब्रीजेम्स१ पीटर२ पीटर१ योहान२ योहान३ योहानजुदाईप्रकटीकरण1 1 1 १२ १२३४५६७८९१०१११२१३1 1 1 : २ १२३४५६७८९१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१२२२३२४२५२६२७२८२९1 1 1 मराठी बायबल (BSI) 2018 इब्री १२ टिपा जतन करा १ [1]तर मग आपण विश्वास ठेवणाऱ्या साक्षीदारांच्या एवढ्या महान साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व अडथळे व सहज गुंतविणारे पाप सोडून आपल्याला नेमून दिलेल्या शर्यतीत निर्धाराने धावावे.२ [2]आपण आपला विश्वास उत्पन्न करणारा व पूर्ण करणारा येशू ह्याच्यावर लक्ष केंद्रित करावे. जो आनंद त्याच्यापुढे होता, त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून क्रूस सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.३ [3]तुमची मने खचून तुम्ही विश्वास सोडून देऊ नये म्हणून ज्याने पापी लोकांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा.४ [4]तुम्ही पापाशी झगडत असता तुमचे रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही;५ [5]तुम्हांला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, परमेश्वराच्या शिस्तीचा अनादर करू नकोस किंवा त्याच्याकडून तुला शिक्षा होत असता खचू नकोस६ [6]कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्याला तो शिस्त लावतो आणि ज्यांना तो पुत्र म्हणून स्वीकारतो त्या प्रत्येकाला शिक्षा करतो.७ [7]शिस्तीसाठी तुम्ही अडचणी सहन करीत आहात; देव तुम्हांला पुत्राप्रमाणे वागवितो आणि ज्याला बाप शिक्षा करत नाही असा पुत्र कोण आहे?८ [8]जी शिक्षा सर्वांना मिळालेली आहे ती शिक्षा स्वीकारावयास तुम्ही जर तयार नसाल, तर तुम्ही खरे पुत्र नव्हे, तर अनौरस संतती आहात.९ [9]शिवाय शिक्षा करणाऱ्या आपल्या मानवी पित्याचा आपण आदर राखतो, तर मग आपण जो आत्म्याचा पिता आहे, त्याच्या अधिक प्रमाणात अधीन होऊन जिवंत राहू नये काय?१० [10]आपला मानवी पिता त्याला योग्य वाटेल तशी थोडे दिवस शिक्षा करत होता; पण देव जी शिक्षा करतो, ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पावित्र्याचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो.११ [11]कोणतीही शिक्षा त्यावेळी खेदाची वाटते, आनंदाची वाटत नाही; परंतु ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.१२ [12]तर मग लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा१३ [13]आणि सरळ मार्गावर चालत राहा, ह्यासाठी की, लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा.१४ [14]सर्वांबरोबर शांतीने राहण्याचा व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही, ते पवित्रीकरण मिळविण्याचा झटून प्रयत्न करा;१५ [15]देवाच्या कृपेकडे पाठ फिरवू नका. ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील, असे कोणतेही कटुतेचे मूळ अंकुरित झाल्यावर उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठपण विकले, त्या एसावसारखे कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, ह्याकडे लक्ष द्या.१६ [16]***१७ [17]तुम्हांला माहीत आहे की, त्यानंतर तो वारशाने आशीर्वाद मिळविण्याची इच्छा करत असताही त्याला नकार मिळाला. त्याने जरी अश्रू ढाळून पश्चात्ताप करायची संधी शोधली, तरी ती त्याला मिळाली नाही.१८ [18]प्रज्वलित पर्वत, अंधकार, घोर नैराश्य, वादळ,१९ [19]कर्ण्याचा नाद व शब्दध्वनी ह्या इंद्रियगोचर गोष्टींकडे इस्राएली लोक आले होते, ह्याकडे तुम्ही आला नाहीत. तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की, देवाचे आमच्याबरोबर अधिक बोलणे होऊ नये;२० [20]कारण पशूदेखील त्या पर्वताला शिवला तर त्यास धोंड्यांनी मारावे, ही आज्ञा त्यांना असह्य झाली;२१ [21]ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, ‘मी फारच भयभीत व कंपित झालो आहे!’२२ [22]पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, अगणित देवदूतांबरोबर उत्सव करणारा,२३ [23]स्वर्गातील प्रथम जन्मलेल्यांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, परिपूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे,२४ [24]नव्या कराराचा मध्यस्थ येशू आणि ज्या रक्ताचे अभिवचन हाबेलच्या रक्ताच्या वचनापेक्षा श्रेष्ठ आहे, ते शिंपडलेले रक्त ह्यांच्याजवळ आला आहात.२५ [25]जो बोलत आहे, त्याचा अवमान करू नये म्हणून जपा; कारण पृथ्वीवर संदेश सांगणाऱ्याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत आणि स्वर्गातून बोलणाऱ्याकडे आपण पाठ फिरवली, तर आपला निभाव कसा लागेल?२६ [26]त्या वेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हालविली; परंतु त्याने दिलेले वचन आता असे म्हणते की, ‘आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कंपित करीन.’२७ [27]आणखी एकदा ह्याचा अर्थ असा होतो की, निर्मित वस्तू विचलित होतील व काढून टाकल्या जातील; ते ह्यासाठी की, अचल वस्तू टिकून राहाव्यात.२८ [28]म्हणून अविचल राज्य आपल्याला मिळत असल्याकारणाने आपण कृतज्ञ राहू या, म्हणजे देव प्रसन्न होइल अशी त्याची आराधना आदरयुक्त भयाने करता येईल.२९ [29]आपला देव खरोखर भस्म करणारा अग्नी आहे.Marathi Bible (BSI) 2018 The Bible Society of India मराठी बायबल (BSI) 2018 इब्री १२ 00:00:00 00:00:00 0.5x 2.0x https://beblia.bible:81/BibleAudio/marathibsi/hebrews/012.mp3 13 12