१४. पूर्वद्वाराची चिठ्ठी शलेम्याचा नावाची निघाली. त्यांनी त्याचा पुत्र जखर्या जो सुज्ञ मंत्री होता त्याच्या नावाची चिठ्ठी टाकली ती उत्तरद्वाराची निघाली.
१५. दक्षिणद्वाराची चिठ्ठी ओबेद-अदोम ह्याच्या नावाची निघाली, त्याच्या मुलांच्या नावावर भांडारगृहाची चिठ्ठी निघाली.
१६. शुप्पीम व होसा ह्यांच्या नावांची चिठ्ठी पश्चिमद्वाराची निघाली; शल्लेकेथ नावाच्या द्वाराजवळ चढून जाण्याच्या सडकेवर समोरासमोर त्यांनी पहारा करावा असे ठरले.
१७. पूर्वेच्या बाजूस सहा लेवी, उत्तरेस रोजचे चार व दक्षिणेस रोजचे चार व भांडारगृहावर दोन-दोन असे नेमले.
१८. पश्चिमेस परवार (मंदिराचे शिवार) ह्याच्यासाठी सडकेजवळ चार व खुद्द परवार येथे दोन.
१९. हे द्वारपाळांचे वर्ग होत; त्यांतले काही कोरह वंशातले व काही मरारी वंशातले होते.
२०. लेव्यांपैकी अहिया हा देवमंदिराच्या भांडारांवर व देवाला वाहिलेल्या वस्तूंच्या भांडारावर होता.
२१. लादानाचे वंशज: लादान गेर्षोनी ह्यांच्या पितृकुळातला प्रमुख पुरुष यहीएली.
२२. यहीएलीचे पुत्र जेथाम व त्याचा भाऊ योएल; हे परमेश्वराच्या मंदिराच्या भांडारगृहांवर होते.
२३. अम्रामी, इसहारी, हेब्रोनी, उज्जीएली ह्यांपैकी काही होते,
२४. आणि अबुएल बिन गेर्षोम बिन मोशे भांडारांवर नायक होता.
२५. त्याचे भाऊबंद हे: अलियेजराचा पुत्र रहब्या, त्याचा पुत्र यशाया, त्याचा पुत्र योराम, त्याचा पुत्र जिख्री व त्याचा पुत्र शलोमोथ.
२६. दावीद राजा, पितृकुळांचे मुख्य पुरुष, सहस्रपती, शतपती, व मुख्य सेनापती ह्यांनी देवाला वाहिलेल्या वस्तूंच्या भांडारांवर शलोमोथ व त्याचे भाऊबंद ह्यांना नेमले होते.
२७. लढाईत जी लूट त्यांना मिळत असे तिच्यापैकी काही परमेश्वराचे मंदिर दुरुस्त करण्यासाठी ते समर्पण करीत.
२८. शमुवेल द्रष्टा, कीशाचा पुत्र शौल, नेराचा पुत्र अबनेर, आणि सरूवेचा पुत्र यवाब ह्यांनी ज्या वस्तू समर्पित केल्या होत्या त्या व इतरांनी ज्या समर्पित केल्या होत्या त्या सर्व शलोमोथ व त्याचे बांधव ह्यांच्या हवाली केल्या होत्या.
२९. इसहार्यांपैकी कनन्या व त्याचे वंशज ह्यांना इस्राएलाच्या सरदारीचे व न्यायाचे बाहेरले काम चालवण्यासाठी नेमले होते.
३०. हेब्रोन्यांपैकी हशब्या व त्याचे भाऊबंद एक हजार सातशे हे वीर असून ते यार्देनेच्या पश्चिमेस परमेश्वराच्या सर्व सेवेसंबंधाने व राज्याच्या कामगिरीसंबंधाने इस्राएलावर देखरेख करणारे होते.
३१. हेब्रोन्यांतला यरीया हा त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांचा मुख्य होता. दाविदाच्या कारकिर्दीच्या चाळिसाव्या वर्षी त्यांचा शोध केला तेव्हा त्यांतले काही शूर वीर गिलादातल्या याजेरात सापडले.
३२. त्यांचे बांधव वीर असून आपापल्या पितृकुळांचे मुख्य होते; ते दोन हजार सातशे होते. त्यांना दावीद राजाने देवाच्या कार्यासंबंधाने व राजाच्या सर्व कारभारासंबंधाने रऊबेनी, गादी, व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांच्यावर देखरेख करण्याच्या कामावर नेमले होते.
१. इस्राएल लोकांची गणती म्हणजे पितृकुळांतील मुख्य पुरुष, सहस्रपती, शतपती व त्यांचे सरदार ह्यांची आणि जे वर्षभर प्रतिमासी कामावर हजर होते, सुटी मिळाली म्हणजे जात व अशा प्रकारे राजाची सेवाचाकरी करीत त्यांची प्रत्येक वर्गाप्रमाणे गणती चोवीस हजार होती.
२. पहिल्या महिन्याच्या पहिल्या वर्गावर जब्दीएलाचा पुत्र याशबाम होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
३. तो पेरेसाच्या वंशातला होता व पहिल्या महिन्यात सैन्याच्या सर्व सरदारांचा मुख्य असे.
४. दुसर्या महिन्याच्या वर्गावर दोदय अहोही हा आणि त्याचा वर्ग असे; मिक्लोथ हा त्यांचा नायक होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
५. तिसर्या महिन्याचा तिसरा सेनापती यहोयादा ह्याचा पुत्र बनाया, हा मुख्य याजक होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते,
६. तिसांमध्ये शूर व तिसांमध्ये वरिष्ठ असा जो होता तोच हा बनाया; त्याचा पुत्र अम्मीजाबाद हाही त्याच्याच वर्गात होता.
७. चौथ्या महिन्याचा चवथा सरदार यवाबाचा भाऊ असाएल हा होता; त्याच्यामागून त्याचा पुत्र जबद्या हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
८. पाचव्या महिन्याचा पाचवा सरदार शम्हूथ इज्राही हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
९. सहाव्या महिन्याचा सहावा सरदार इक्केशाचा पुत्र ईरा तकोई हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
१०. सातव्या महिन्याचा सातवा सरदार एफ्राइमाच्या वंशातला हेलस पलोनी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
११. आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हूशाथी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
१२. नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबियेजेर अनाथोथी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
१३. दहाव्या महिन्याचा दहावा सरदार जेरह वंशातला महरय नटोफाथी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
१४. अकराव्या महिन्याचा अकरावा सरदार एफ्राइमाच्या वंशातला बनाया पिराथोनी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
१५. बाराव्या महिन्याचा बारावा सरदार अथनिएल वंशातला हेल्दय नटोफाथी हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.
१६. आणखी इस्राएलाच्या वंशांवरील हे अधिकारी होते: रऊबेन वंशाचा अधिकारी जिख्रीचा पुत्र अलिएजर हा होता; शिमोन वंशाचा अधिकारी माकाचा पुत्र शफाट्या हा होता,
१७. लेवी वंशाचा अधिकारी कमुवेलाचा पुत्र हशब्या; अहरोन वंशाचा अधिकारी सादोक;
१८. यहूदा वंशाचा अधिकारी दाविदाच्या भाऊबंदातला अलीहू; इस्साखार वंशातला अधिकारी मीखाएलाचा पुत्र अम्री;
१९. जबुलून वंशाचा अधिकारी ओबद्याचा पुत्र इश्माया; नफताली वंशाचा अधिकारी अज्रिएलाचा पुत्र यरीमोथ;
२०. एफ्राईम वंशाचा अधिकारी अजर्याचा पुत्र होशेथ; मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी पदायाचा पुत्र योएल;
२१. गिलादातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी जखर्याचा पुत्र इद्दो; बन्यामीन वंशाचा अधिकारी अबनेराचा पुत्र यासीएल;
२२. दान वंशाचा अधिकारी यरोहामाचा पुत्र अजरेल; हे इस्राएलाच्या वंशाचे सरदार होते.
२३. तथापि दाविदाने वीस वर्षांचे व त्यांहून कमी वयाचे लोक ह्यांची गणती केली नाही. कारण इस्राएलाची संख्या आकाशातील तार्यांप्रमाणे वाढवीन असे परमेश्वराने म्हटले होते.
२४. सरूवेचा पुत्र यवाब हा गणती करू लागला, पण त्याने ते काम पूर्ण केले नाही; कारण त्यामुळे देवाचा कोप इस्राएलावर भडकला; ही गणती दावीद राजाच्या बखरीत लिहिलेली नाही.
२५. राजाच्या भांडारावर अदीएलाचा पुत्र अजमावेथ हा होता; आणि शेतातल्या, नगरातल्या, गावातल्या व किल्ल्यातल्या भांडारांवर उज्जीयाचा पुत्र योनाथान हा होता;
२६. जमिनीची लागवड करणार्या शेतकर्यांवर कलूबाचा पुत्र एज्री हा होता;
२७. द्राक्षाच्या मळ्यावर शीमी रामाथी हा होता; आणि द्राक्षाच्या मळ्यांच्या उत्पन्नावर व द्राक्षारसाच्या कोठ्यांवर जब्दी शिफमी हा होता;
२८. जैतून झाडांवर व सखल प्रदेशातील उंबराच्या झाडांवर बाल-हानान गदेरी हा होता; तेलाच्या कोठ्यांवर योवाश हा होता;
२९. जी गुरे शारोनात चरत असत त्यांवर शित्रय शारोनी हा होता; खोर्यातल्या गुरांवर अदलय ह्याचा पुत्र शाफाट हा होता;
३०. उंटांवर ओबील इश्माएली हा होता; गाढवांवर येहद्या मेरोनोथी हा होता;
३१. आणि मेंढरांवर याजीज हाग्री हा होता; हे दावीद राजाच्या धनावर अधिकारी होते.
३२. दाविदाचा चुलता योनाथान हा मंत्री असून मोठा समजूतदार व लेखक होता; हखमोन्याचा पुत्र यहीएल राजपुत्रांबरोबर असे;
३३. अहीथोफेल हा राजाचा मंत्री होता; आणि हूशय अर्की हा राजाचा मित्र होता.
३४. अहीथोफेलामागून बनायाचा पुत्र यहोयादा व अब्याथार हे मंत्री झाले; आणि राजाचा सेनापती यवाब हा होता.
५६. तरी त्यांनी परात्पर देवाची परीक्षा पाहिली व त्याच्याविरुद्ध बंड केले, व त्याचे निर्बंध पाळले नाहीत,
५७. तर आपल्या पूर्वजांप्रमाणे त्याच्याकडे पाठ करून ते फितूर झाले; फसव्या धनुष्यासारखे ते भलतीकडे वळले.
५८. त्यांनी आपल्या उच्च स्थानांमुळे त्याला राग आणला; आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्याला ईर्ष्या आणली.
५९. हे ऐकून देव कोपला आणि इस्राएलास अगदी कंटाळला;
६०. त्याने शिलो येथील निवासमंडप म्हणजे मानवामध्ये उभारलेला आपला डेरा सोडून दिला;
६१. त्याने आपल्या बलाचा पाडाव होऊ दिला, व आपले वैभव शत्रूच्या हाती पडू दिले.
६२. त्याने आपले लोक तलवारीच्या हवाली केले; आपल्या वतनावर तो रुष्ट झाला.
६३. अग्नीने त्यांचे कुमार खाऊन टाकले; त्यांच्या कुमारींना लग्नगीते लाभली नाहीत.
६४. त्यांचे याजक तलवारीने पडले, व त्यांच्या विधवा रडल्या नाहीत.
६५. तेव्हा प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला. द्राक्षारस पिऊन आरोळी मारणार्या वीरासारखा उठला.
६६. त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हटवले; त्यांची कायमची अप्रतिष्ठा केली.
४. हिवाळा लागल्यामुळे आळशी नांगरीत नाही; म्हणून हंगामाच्या वेळी तो भीक मागेल, पण त्याला काही मिळणार नाही.
५. मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढतो.
१. कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा कोणीएक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता.
२. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांना फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता.
३. त्याने दिवसाच्या सुमारे तिसर्या प्रहरी दृष्टान्तात असे स्पष्टपणे पाहिले की, आपणाकडे देवाचा दूत येत असून “कर्नेल्या,” अशी आपणास हाक मारत आहे.
४. तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, “काय महाराज?” त्याने त्याला म्हटले, “तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत.
५. तर आता यापोस माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण; त्याला पेत्रही म्हणतात.
६. तो शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणार्या चांभाराच्या येथे उतरला आहे; त्याचे घर समुद्राच्या किनार्यास आहे. [तुला काय करावे लागेल हे तो तुला सांगेल.]”
७. जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो निघून गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या दोघा चाकरांना व आपल्या हुजरातीतल्या एका भक्तिमान शिपायाला बोलावले;
८. आणि त्यांच्याजवळ सर्व सविस्तर सांगून त्यांना यापोस पाठवले.
९. ते दुसर्या दिवशी वाटेवर असता गावाजवळ येताना दोन प्रहराच्या सुमारास पेत्र प्रार्थना करण्यास धाब्यावर गेला.
१०. तेव्हा त्याला भूक लागून काही खावेसे वाटले; आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यात त्याचे देहभान सुटले.
११. तेव्हा आकाश उघडलेले व मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे असा दृष्टान्त त्याला झाला.
१२. त्यात पृथ्वीवरील सर्व चतुष्पाद, सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे होती.
१३. मग त्याने अशी वाणी ऐकली की, ‘पेत्रा, ऊठ; मारून खा.’
१४. पेत्र म्हणाला, “नको, नको, प्रभू; कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही.”
१५. मग दुसर्यांदा अशी वाणी झाली की, “देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस.”
१६. असे तीन वेळा झाले आणि लगेच ते पात्र आकाशात वर घेतले गेले.
१७. आपण पाहिलेल्या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा ह्याविषयी पेत्र विचारात पडला असता, पाहा, कर्नेल्याने पाठवलेली माणसे शिमोनाचे घर शोधल्यावर दरवाजाजवळ येऊन उभी राहिली;
१८. आणि त्यांनी हाक मारून विचारले, “शिमोन पेत्र येथे पाहुणा उतरला आहे काय?”
१९. पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करत असता आत्मा त्याला म्हणाला, “पाहा, तीन माणसे तुझा शोध करत आहेत.
२०. तर ऊठ, खाली ये आणि काही संशय न धरता त्यांच्याबरोबर जा; कारण मीच त्यांना पाठवले आहे.”
२१. पेत्र त्या माणसांकडे खाली येऊन म्हणाला, “पाहा, ज्याचा शोध तुम्ही करत आहात तो मी आहे; तुम्ही कोणत्या कारणामुळे येथे आलात?”
२२. ते म्हणाले, “कर्नेल्य शताधिपती हा नीतिमान मनुष्य असून देवाचे भय बाळगणारा आहे आणि सर्व यहूदी लोक त्याच्याविषयी चांगली साक्ष देतात. त्याला पवित्र देवदूताने सुचवले आहे की, आपणाला घरी बोलावून आपणाकडून संदेश ऐकावा.”
२३. मग त्याने त्यांना आत बोलावून त्यांचा पाहुणचार केला. दुसर्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला आणि यापोतील बंधुजनांपैकी कित्येक त्याच्याबरोबर गेले.
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide