१. यहोशवा आता वृद्ध व वयातीत झाला होता; तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तू वृद्ध व वयातीत झाला आहेस आणि बराचसा देश अजून ताब्यात घ्यायचा राहिला आहे.
२. बाकी राहिलेला देश हा: पलिष्टी आणि गशूरी ह्यांचा अवघा प्रदेश,
३. (मिसर देशाच्या पूर्वेकडील शीहोर नदीपासून उत्तरेकडील एक्रोनाच्या सीमेपर्यंतचा प्रदेश कनान्यांचा समजला जातो; त्यात पलिष्ट्यांचे पाच सुभे होते, म्हणजे गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन);
४. ह्यांखेरीज दक्षिणेकडले अव्वी, अफेक व अमोर्यांच्या सरहद्दीपर्यंतचा कनान्यांचा सर्व देश व सीदोन्यांचा मारा नावाचा देश;
५. आणि गिबल्यांचा देश व हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बाल-गादापासून हमाथाच्या खिंडीपर्यंतचा पूर्वेकडील सर्व लबानोन.
६. लबानोनापासून मिस्रपोथ-माईमापर्यंतच्या डोंगराळ प्रदेशातील सीदोनाच्या रहिवाशांना मी इस्राएल लोकांपुढून घालवून देईन; तू मात्र माझ्या आज्ञेप्रमाणे चिठ्ठ्या टाकून त्यांचा देश इस्राएल लोकांना वाटून दे.
७. हा देश नऊ वंश व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतनादाखल वाटून दे.” मनश्शे, रऊबेन व गाद ह्यांना देण्यात आलेला प्रदेश
८. मनश्शेच्या बाकीच्या अर्ध्या वंशाबरोबर रऊबेनी व गादी ह्यांना आपल्या वतनाचा वाटा मिळालेला आहे. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने त्यांच्याशी ठरवल्याप्रमाणे पूर्वेस यार्देनेपलीकडे त्यांना वतन दिले आहे,
९. म्हणजे आर्णोन खोर्याच्या सीमेवरील अरोएर व खोर्यामधले नगर येथपासून दीबोनापर्यंतचे मेदबाचे पठार,
१०. हेशबोनावर राज्य करणारा अमोर्यांचा राजा सीहोन ह्याची अम्मोन्यांच्या हद्दीपर्यंतची सारी नगरे,
११. गिलाद, तसेच गशूरी व माकाथी ह्यांचा सारा प्रदेश, हर्मोन पर्वत आणि सलकापर्यंतचा सर्व बाशान,
१२. म्हणजे रेफाईतला एकटाच वाचलेला अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करणारा बाशानाचा ओग ह्याचे सारे राज्य; ह्यांचा मोशेने मोड करून त्यांना हाकून लावले होते.
१३. तरी इस्राएल लोकांनी गशूरी व माकाथी ह्यांना देशाबाहेर काढले नाही; गशूरी व माकाथी आजवर इस्राएलात वस्ती करून आहेत.
१४. लेवी वंशाला मात्र मोशेने कोणतेही वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे त्याला वाहिलेली हव्ये ही त्यांचा वतनभाग होत.
१५. मोशेने रऊबेनी वंशाला त्याच्या कुळांप्रमाणे वतन दिले.
१६. त्यांचा मुलुख म्हणजे आर्णोन खोर्याच्या सीमेवरील अरोएर व खोर्यामधले नगर येथपासून मेदबापर्यंतचे पठार,
१७. हेशबोन व पठारावरली त्याची सर्व नगरे, दीबोन, बामोथ-बाल, बेथ-बाल-मोन;
२१. पठारावरली सर्व नगरे, हेशबोनात राज्य करणारा अमोर्यांचा राजा सीहोन ह्याचे सर्व राज्य; ह्या राजाला व त्याच्याबरोबर त्या देशात राहणारे सीहोनाचे मांडलिक म्हणजे मिद्यानाचे सरदार अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा ह्यांना मोशेने ठार मारले.
२२. इस्राएल लोकांनी तलवारीने ज्यांचा संहार केला त्यांत बौराचा पुत्र बलाम दैवज्ञ हाही होता.
२३. यार्देन व तिला लागून असलेली जमीन रऊबेन्यांची सीमा ठरली. रऊबेन्यांचा वतनभाग त्यांच्या कुळांप्रमाणे नगरे व खेडी ह्यांसहित हाच ठरला.
२४. मग मोशेने गाद वंशालाही त्यांच्या कुळांप्रमाणे वतन दिले.
२५. त्यांचा मुलुख म्हणजे याजेर, गिलादातली सर्व नगरे आणि राब्बाच्या पूर्वेकडील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा प्रदेश.
२७. खोर्यातील बेथ-हाराम, बेथ-निम्रा, सुक्कोथ, साफोन, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन ह्याचे उरलेले राज्य; यार्देन व तिच्या पूर्वेस किन्नेरेथ सरोवराच्या शेवटापर्यंतचा तिला लागून असलेला प्रदेश.
२८. गाद्यांचे वतन त्यांच्या कुळांप्रमाणे नगरे व खेडी ह्यांसहित हेच ठरले.
२९. मग मोशेने मनश्शेच्या अर्ध्या वंशाला वतन दिले; ते मनश्शेच्या अर्ध्या वंशाला त्यांच्या कुळांप्रमाणे दिले होते.
३०. त्यांचा मुलुख महनाइमापासून सगळा बाशान म्हणजे बाशानाचा राजा ओग ह्याचे सर्व राज्य आणि बाशानातली याईर येथील सगळी साठ नगरे येथपर्यंत होता.
३१. अर्धा गिलाद आणि बाशानाचा राजा ओग ह्याच्या राज्याच्या अष्टारोथ व एद्रई ह्या राजधान्या, मनश्शेचा पुत्र माखीर ह्याच्या वंशाचे म्हणजे माखीराच्या अर्ध्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे वतन ठरले.
३२. यरीहोच्या पूर्वेस यार्देनेपलीकडे मवाबाच्या मैदानात मोशेने वाटून दिलेली वतने ही होत;
३३. पण लेवी वंशाला मोशेने वतन दिले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर हाच त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे वतन होय.
१. एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएली वंशांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांनी ही वतने इस्राएल लोकांना कनान देशात वाटून दिली.
२. परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते साडेनऊ वंशांना चिठ्ठ्या टाकून वाटण्यात आले;
३. अडीच वंशांना मोशेने यार्देनेच्या पूर्वेस वतन दिले होतेच, पण लेवी वंशाला इतरांप्रमाणे काहीएक वतन दिले नव्हते.
४. योसेफाच्या संतानाचे दोन वंश होते, ते म्हणजे मनश्शे व एफ्राईम; त्या देशात लेव्यांना त्यांनी काहीच वाटा दिला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि गुरेढोरे व कळप ह्यांच्यासाठी गायराने दिली होती.
५. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेला अनुसरून इस्राएल लोकांनी तो देश वाटून घेतला. कालेबाला हेब्रोन देण्यात येते
६. मग यहूदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाकडे आले आणि कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब त्याला म्हणाला, “परमेश्वराने देवभक्त मोशे ह्याला तुझ्याविषयी व माझ्याविषयी कादेश-बर्ण्यात काय सांगितले होते ते तुला माहीत आहेच.
७. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने मला हा देश हेरायला कादेश-बर्ण्याहून पाठवले तेव्हा मी चाळीस वर्षांचा होतो आणि मी प्रामाणिकपणे खबर काढून आणली.
८. माझ्याबरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणीपाणी होईल असे केले, पण मी मात्र आपला देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो.
९. त्या दिवशी मोशे मला शपथेवर म्हणाला की, ‘तू माझा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलास म्हणून ज्या भूमीला तुझे पाय लागले आहेत ती तुझे आणि तुझ्या वंशजांचे निरंतरचे वतन होईलच होईल.’
१०. इस्राएल रानात प्रवास करत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले तेव्हापासून आज पंचेचाळीस वर्षे परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे; आज बघ, मी पंचाऐंशी वर्षांचा आहे.
११. मोशेने मला पाठवले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे; लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्या वेळी होती तेवढीच आजही आहे.
१२. तेव्हा परमेश्वराने त्या वेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे; तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन.”
१३. मग यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन वतन करून दिले,
१४. म्हणूनच कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याचे हेब्रोन हे आजपर्यंत वतन झाले आहे; ह्याचे कारण इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे तो निष्ठापूर्वक वागला.
१५. पूर्वी हेब्रोनाचे नाव किर्याथ-आर्बा होते. आर्बा हा अनाक्यांचा प्रमुख होता. ह्यानंतर त्या देशात शांतता प्रस्थापित झाली.
२०. जर आम्ही आपल्या देवाचे नाव विसरलो असतो व अन्य देवापुढे हात पसरले असते,
२१. तर देवाने हे शोधून काढले नसते काय? कारण तो मनातील गुप्त गोष्टी जाणतो.
२२. तरी तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे; कापायच्या मेंढरांसारखे आम्हांला गणतात.
२३. हे प्रभू, जागा हो, का झोपलास? ऊठ, आमचा कायमचा त्याग करू नकोस.
२४. तू आपले मुख का लपवतोस? आमचे दुःख व आमचा छळ का विसरतोस?
२५. आमचा जीव धुळीस मिळत आहे; आमचे पोट भूमीस लागत आहे.
२६. आमच्या साहाय्यार्थ ऊठ, आपल्या वात्सल्यानुसार आमचा उद्धार कर.
३. मूर्खाच्या तोंडीच गर्वाची काठी असते, पण सुज्ञाची वाणी त्याचे रक्षण करते.
१. मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करत होता; ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले तसे आपणही आम्हांला शिकवा.”
२. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा: “हे [आमच्या स्वर्गातील] पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. [जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.]
३. आमची रोजची भाकर रोज आम्हांला दे;
४. आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करतो; आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस, [तर आम्हांला वाइटापासून सोडव.]”
५. मग त्याने त्यांना म्हटले, “तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे;
६. कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काही नाही;’
७. आणि तो आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नकोस; आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत; मी उठून तुला देऊ शकत नाही’?
८. मी तुम्हांला सांगतो, तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल.
९. मी तुम्हांला सांगतो, मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल; शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल; ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.
१०. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल.
११. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे, की जो आपल्या मुलाने भाकर मागितली असता धोंडा देईल? किंवा मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल?
१२. किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल?
१३. तुम्ही वाईट असताही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?”
१४. एकदा तो एक भूत काढत होता व ते मुके होते. तेव्हा असे झाले की, भूत निघाल्यावर मुका बोलू लागला; त्यावरून लोकसमुदायास आश्चर्य वाटले.
१५. पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बाल्जबूल त्याच्या साहाय्याने हा भुते काढतो”;
१६. आणि दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरता त्याच्याजवळ स्वर्गीय चिन्ह मागू लागले.
१७. परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते, आणि घरावर घर पडते.
१८. सैतानातही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? कारण मी बाल्जबूलाच्या साहाय्याने भुते काढतो असे तुम्ही म्हणता.
१९. पण मी जर बाल्जबूलाच्या साहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? ह्यामुळे तेच तुमचा न्याय करतील.
२०. परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने१ भुते काढत आहे, तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे.
२१. सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते;
२२. परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो, तेव्हा ज्या शस्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो.
२३. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे; आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळतो.
२४. मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जल स्थळांमधून विश्रांतीचा शोध करत हिंडतो आणि ती न मिळाल्यास तो म्हणतो, ‘ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन.’
२५. आणि तो आल्यावर त्याला ते झाडलेले व सुशोभित केलेले आढळते.
२६. नंतर तो जाऊन त्याच्यापेक्षा दुष्ट असे सात आत्मे बरोबर घेतो; आणि ते आत शिरून तेथे राहतात; मग त्या मनुष्याची ती शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते.”
२७. मग असे झाले की, तो ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणीएक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, “ज्या उदराने तुझा भार वाहिला व जी स्तने तू चोखलीस ती धन्य!”
२८. तेव्हा तो म्हणाला, “पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!”
Marathi Bible 2015
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र 2015 by The Bible Society of India Used by permission. worldwide